पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करायला गेला एक, झाले भलतेच कलेक्टरपर्यंत आली, पण तेथेंच तिची गति खुंटली. तिच्या पवित्र जलाचा उप- योग सामान्य जनसमूहाला झाला नाहीं. एवंच 'आडांतच नाही मग पोहोन्यांत कोटून येणार ? ' ह्या म्हणीप्रमाणे कमिशनच्या रिपोर्टरूपी आडांतच जर प्रजेच्या हक्काचा खडखडाट, तर हिंदुस्थान सरकारच्या ठरावरूपी पोहोऱ्यांत आम्हांस काय लभ्यांश होणार ? देशांतील उद्योगधंद्यांना उत्तेजन देण्याकरितां आपआपल्या प्रांतांतील कारखान्यांना उत्तेजनार्थ कांहीं विविक्षित मर्यादेपर्यंत देणगी देण्याचा अधिकार आपणांस असावा अशी मागणी संयुक्तप्रांताचे माजी ले. गव्हर्नर सर जॉन हएट ह्यांनी केली होती. परंतु कमिशनच्या सभासदांना तेवढी मागणी सुद्धां मान्य करवली नाहीं, आणि असल्या कामी हिंदुस्थान सरकारचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे, असा त्यांस जबाब मिळाला. असो, तात्पर्य काय की, प्रस्तुतचा प्रसिद्ध झालेला ठराव घ्या, अगर ह्यापुढे प्रांतिक सरकारच्या खर्चाच्या मर्यादेची व्याति वाढविण्याचा जो ठराव पुढे येण्याचे अभिवचन मिळाले आहे तो ठराव धुंडाळून पहा, प्रजेच्या अधिकाराचें क्षेत्र वाढल्याचे त्यांत आढळणार नाही असे. आम्हांस वाटते. करायला गेला एक, झालें भलतेंच [ होमरूल लीगची चळवळ देशभर जोरानें पसरत चाललेली पाहून बावरलेल्या नोकरशाहीचे स्वयंभू पुढारी, मद्रासचे गव्हर्नर, लॉर्ड पेंटलंड यांनी बेझंटबाई आणि त्यांचे दोघे सहकारी यांना स्थानबद्ध करून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवलें. पोटांतला हेतु हा कीं, अशा दबकावणीनें होमस्लची चळवळ दबून जाऊन मंदावेल. पण लॉर्ड पेंटलंड यांना अनुभव मात्र उलटा आला. बेझंट- बाईंच्या स्थानबद्धतेमुळे हिंदुस्थानांत सर्वत्र खळबळ उडाली. जे प्रतिष्ठित लोक पूर्वी होमरूलच्या चळवळींत सामील झाले नव्हते ते अहमहमिकेनें होमरूल लीगचे सभासद होऊं लागले. पं. मदन्द मोहन, बाबू सुरेंद्रनाथ, ना. भुग्री, बॅ. जिना इत्यादि अनेक हिंदु व मुसलमान पुढारी होमरूलच्या चळवळीला पाठिंबा देऊं लागले आणि लॉर्ड पैटलंड यांचा निषेध करून त्यांना परत बोलवा अशी मागणी करणाऱ्या शेंकडों तारा विलायतेस रवाना झाल्या. बेझंटबाईच्या स्थान- बद्धतेमुळे हा जो पेंटलंड यांच्या अपेक्षेच्या विरुद्ध परिणाम झाला त्या प्रति- क्रियेचें वर्णन यांत आहे. ] ( केसरी, दि. २६ जून १९१७ )