पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ • यांस असल्यामुळे १०।१२ तास आधी ही पुस्तकें हाती आल्याबरोबर त्यांतील नेमकी स्थानें कोणती पाहावयाची ती पाहून त्यांचा त्या वेळांत लेख तयार होई. कित्येक लेखकांना स्वतः लिहिलेल्या लेखांचीं मुद्रितें पाहिल्यावर इतरांच्या लेखांचीं मुद्रितें तपासणें हें काम कंटाळवाणे वाटतें. ज्याची त्यानें मुद्रितें पाहिली आहेत असे कळल्यावर ती बारकाईनें वाचण्याचें काम इतर संपादक स्वाभाविकपणेंच टाळतात. साधारणपणें वरवर अवलोकन करून काम भागण्यासारखेंहि असतें. पण श्री. करंदीकर यांचें मुद्रितांचें वाचन हें आमूलाग्र वाचन असेंच नेहमीं असतें, • मग तो लेख स्वतःचा असो वा दुसऱ्याचा असो. कर्तव्य म्हणजे यथासांग कर्तव्य, त्यांत मुख्य आणि गौण असा भेद ते करीत नाहींत. स्वतः लिहिण्याइतकेंच इतरांचें लिहिलेलें तपासून दुरुस्त करणे किंवा इतरांच्या लेखांचीं मुद्रित दुरुस्त करणें हें काम किचकट आहे. दुसऱ्यांचें लिखाण म्हणून आपपरभाव आणि तदनुसार त्यावर श्रम करण्याचें तारतभ्य उत्पन्न होणे स्वाभाविक असतें. पण श्री. करंदीकर यांची आत्मी- यता ही ते संपादक होते त्या काळांत केसरीच्या एकूणएक स्तंभांशी ( अर्थातच जाहिराती वगळून) निगडित झालेली असे. जसें इतरांच्या लिखाणाचें तसेच केसरीच्या स्तंभांत आलेल्या विषयांच्या बाबतींतहि म्हणतां येईल. कोणचा विषय का होईना, तो केसरीच्या स्तंभांमध्ये आला म्हणजे त्यांत सारखेंच लक्ष श्री. करंदीकर हे घालीत. हुंडणावळीच्या प्रश्नावरील किंवा शिरगणतीच्या आंकड्यांवरील लेखांचें वाचन संपून क्रिकेटचा सामना किंवा परप्रांतांतील बातमीपत्रे यांचा विषय आला तरी त्यांच्याकडे तितकेंच ते लक्ष देत. संपादकाच्या कामांतून निवृत्त झाल्यावरहि प्रसंग- विशेषीं ते तसें लक्ष देतात. क्रिकेटच्या खेळांतील जयापजय असोत किंवा निवडणुकीचे जयापजय असोत, दोहोंच्या निकालांकडे सारख्याच उत्कटतेनें. त्यांचें लक्ष असें. सर्वांना ठळकपणे दिसणाऱ्या त्यांच्या गंभीरपणावरून क्रिकेटच्या खेळांतील पक्षोपक्षांच्या चुका किंवा विक्रम यांच्या बाबतींत त्यांना कुतूहल असेल असें सहसा वाटत नाहीं. हे त्यांचे कुतूहल प्रत्यक्ष पाहून कित्येकांनी त्यावर विनोद चालविला आहे. पण कोणी आश्चर्य करो वा असंभव मानो, आपण विसदृश असे कांहींच केलेले नाहीं याविषयीं ते निश्चित राहात. केसरीच्या अनुषंगानें उत्पन्न होणाऱ्या सभा-संस्थांच्या चर्चामधून श्री. करंदीकर हे उदासीन राहात नाहींत. लहानसहान ठरावांच्या शब्दयोजने- कडेहि त्यांचें लक्ष असतें. ते ठराव ठाकठीक करण्यास व दुरुस्त्या सुचविण्यास कंटाळा करीत नाहींत. अमुक गोष्ट करावयाची किंवा करावयाची नाहीं असें एकदां ठरल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टीचा बरावाईट निकाल होऊन गेल्यानंतर सिद्धस्य गतिश्चिन्तनीया' असे समजून ते पुढील क्रम शांतपणें अनुसरतात. 6 4 'झाल्या गोष्टींबद्दल शोक करूं नये', इत्यादि दंडक तोंडाने सांगणे सोपे आहे, पण आचरणांत आणणे फार कठीण आहे. झालेल्या अनिष्ट गोष्टीनें उत्पन्न होणाऱ्या