पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ अनेक वेळां दिसून आले आहे. स्वतःवर वैयक्तिक टीका झाली असतांना तात्यासाहेब केळकर हे त्या योगें कधीं कधीं अस्वस्थ होत. उलट काकासाहेब खाडिलकर हे असल्या वैयक्तिक टीका वाचण्याचेहि श्रम घेत नसत. पण श्री. तात्यासाहेब करंदीकर हे आपल्या वाचनांतून कोणतीच बारीक गोष्ट जाऊं देत नाहींत. असे असतांहि असल्या वैयक्तिक वादांतून मूळ गोष्टीला गैरलागू अशा ज्या गोष्टी उगाळल्या जातात त्याला उत्तर देण्याच्या भानगडींत करंदीकर पडत नाहीत. त्यांतील सार्वजनिक महत्त्वाचा आणि वादाच्या मूळ मुद्दयाला धरून असणारा तेवढाच अंश घेऊन त्याला समर्पक उत्तर देऊन टाकतात. त्यानंतर पुनः कोणी त्यांना अवांतर वादांत ओढण्याचा कितीहि यत्न केला तरी त्यांची स्थितप्रज्ञता ढळत नाहीं. लेखी वादाप्रमाणेंच शाब्दिक वादासंबंधीहि म्हणतां येईल. त्यांच्याकडे कोणी बोलण्यास गेला असतां मुख्य कामाच्या गोष्टीबद्दल त्यांनी थोडक्यांत निकाली उत्तर दिल्यानंतर मागाहून उगाच कोणी विपर्यस्त, गैरलागू किंवा वितंडवादाच्या गोष्टी काढल्या तर कांहींच न ऐकल्या- सारखें करून किंबहुना, त्या माणसाची उपस्थितीहि असून नसल्यासारखी करून शांतपणें ते आपल्या चालू असलेल्या लेखनाचा किंवा वाचनाचा क्रमप्राप्त उद्योग करूं लागतात. आपलेआपण कंटाळून तो मनुष्य विराम न पावल्यास पुनः एकदां आपल्या पहिल्या निकाली उत्तराचा उच्चार करून श्री. करंदीकर आपल्या कामास लागतात. यामुळे त्यांचा वायफळ वेळ जात नाही. तसेच चालू असलेल्या वाचन- लेखनांतील त्यांची एकाग्रताहि ढळत नाहीं. पुष्कळ माणसें त्यांची ही अखंड कार्य- मग्नता आणि मितभाषणी प्रवृत्ति यांमुळेच त्यांच्यापुढे वायफळ गोष्टी बोलण्यास धजत नाहींत. शारीरिक किंवा मानसिक कंटाळा किंवा थकवा हा त्यांना माहीतच नाही. यामुळे त्यांच्या संपादकीय कामांत स्थिरता आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी दिसून येतात. ज्यांना हा थकवा येतो त्यांच्या मनांत त्याची भीति राहते, आणि मग तो थकवा येण्याच्या आंत हाती घेतलेले काम संपविण्याची एकप्रकारें घाई त्यांना होते. सर्व विषय वाचून, संपवून नंतर लिहावयास उत्स उरेल किंवा नाहीं अशी शंका अनेकांना येते. यामुळे अर्धवट वाचूनच लिहावयास सुरुवात करण्याची प्रवृत्ति त्यांच्यांत होते. पण श्री. करंदीकर यांच्या संपादकीय कामांत अशा प्रकारची अस्थिरता कधींच दिसून येत नाहीं. यामुळे त्यांचा आत्म- विश्वास कधींच ढळत नाहीं. बहुविध व साक्षेपी संपादकत्व प्रांतिक किंवा मध्यवर्ति सरकारच्या अंदाजपत्रकांची मुख्य आंकड्यांची आणि तपशिलाचीं अशी दोन पुस्तकें येतात. नव्यानें विधिमंडळांत गेलेल्या सभासदांना हें आंकड्यांचें गौडबंगाल उलगडण्याला वर्ष-दोन वर्षांचा काल नि अनुभव लागतो. पण अनेक वर्षे या अंदाजपत्रकी आंकड्यांच्या जंजाळाचा ठाव घेण्याची संवय श्री. करंदीकर