पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इंग्लंड व रशिया यांची तेढ ते ठरावयाचे आहे. तह-परिषदेंत अथवा आधुनिक नांवाने ओळखल्या जाणान्या 'जागतिक शांतता व सुरक्षितता' परिषदेत याचा निर्णय व्हावयाचा आहे. तेव्हां त्या- संबंधांत आतांच कांही लिहिण्याची घाई करण्याचे कारण नाहीं. त्याची चर्चा करण्याला अद्यापि पुष्कळ अवधि आहे. मात्र एक गोष्ट निश्चित असल्याने ती आतांच सांगून ठेवण्यास हरकत नाही. ती हीच की, स्वातंत्र्यरूपी अमृताची वांटणी यथान्याय होत नाहीं असे दिसूं लागतांच, पौराणिक काळांत ज्याप्रमाणे देवदैत्यांचा झगडा पुनश्च सुरू झाला, तसाच झगडा या महायुद्धानंतरहि होणार आहे. त्या झगड्या- लाच कोणी तिसरे महायुद्ध असे म्हणतात. तो झगडा टळणार नाही. याचें कारण हेच की, सागरमंथनांतून निघालेल्या रत्नांची वांटणी यथान्याय झाली नाही आणि अमृताच्या वांटपांतहि पक्षपात व पंक्तिप्रपंच होणार हे ढळढळीत दिसत आहे. अर्थातच पुनश्चं महायुद्ध उद्भवूं नये असे वाटत असल्यास मोहिनीनें अन्याय टाकून सर्वांना अमृताचा सारखा वांटा द्यावा; नाहीतर जगावर तिसऱ्या महायुद्धाची आपत्ति ओढवलेली पाहावयास तयार राहावें. इंग्लंड व रशिया यांची तेढ [ दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जगांत चिरकाल शांतता नांदावी या हेतूने शांतता प्रस्थापित करणारा संयुक्त राष्ट्रसंघ निर्माण करण्यांत आला व त्याच्या बैठकी सुरू झाल्या; तरी राष्ट्राराष्ट्रांतील संशयाचें व भीतीचे वातावरण दूर तर नाहींच, पण त्या राष्ट्रसंघांतच चुरस लागून इंग्लंड आणि रशिया यांच्या- तील तेढ दिवसेंदिवस कशी वाढत आहे, याचा तपशील या लेखांत दिला आहे.] नवी संघटना जगांत चिरंतन शांतता संस्थापन व्हावी, लहान लहान राष्ट्रांना लोकशाही व स्वातंत्र्य या तत्त्वांनुसार सुरक्षितता प्राप्त करून द्यावी आणि क्षांतरराष्ट्रीय तंटे- बखेडे अग्निदिव्याचा प्रयोग केल्याशिवाय पंचायतीच्या मार्गाने तोडावे या हेतूनें दुसऱ्या जागतिक युद्धानंतर "युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन " किंवा संयुक्त राष्ट्रांची संघटना स्थापन केली गेली. या संघटनेंत एकंदर एकावन्न राष्ट्रांचे प्रति- निधि असले तरी ज्या मुख्य समितीच्या हाती सर्व सूत्रे आहेत ती समिति अकरा सभासदांची आहे. यालाच 'सेक्युरिटी कौन्सिल' किंवा 'सुरक्षितता समिति ' ( केसरी, दि. १ फेब्रुवारी १९४६ ) "