पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध हिंदुस्थानच्या वांट्याला शंख !. रशियाला लक्ष्मी मिळून शिवाय इतर रत्नांपैकी सुरा त्याच्या वांट्यासच जाईल. किंबहुना ती आतांच त्यानें आत्मसात् केली आहे असे त्याच्या वर्तनावरून दिसत आहे. इंग्लंडला प्रत्यक्ष फायद्याचें कोणतेंहि रत्न मिळेलसें दिसत नाहीं. महायुद्धाच्या विजयाचें द्योतक असें कौस्तुभ रत्न त्याच्या वांटणीला आलें आहेच. •तेवढ्या मानावरच त्याला संतुष्ट राहावे लागेल. पारिजातक वृक्षहि त्याच्या वांटणीला येईल. पण त्या वृक्षाचा गुणच असा आहे की, त्याचा उपयोग शेजाऱ्यालाच अधिक होतो - त्या दृष्टीनें इंग्लंडला प्राप्त झालेल्या पारिजातकाचा उपयोग त्याच्या वसाह तींनाच अधिक होईल. हिंदुस्थानला वसाहतीचा दर्जाहि अद्यापि मिळालेला नसल्यानें हिंदी लोकांनी त्या पारिजातकाच्या फुलांचा लाभ आपणांस मिळेल असा आशाळभूतपणा धरूं नये. अमेरिकेच्या कर्तबगारीचें फळ म्हणून त्यास कामधेनु मिळून शिवाय उच्चैः श्रवा हें शीघ्र वाहन मिळेल. त्याशिवाय अॅटॉमिक बाँबरूपी सुदर्शनचक्र व धनुष्य हीं शस्त्रें अमेरिकेच्या वांटणीस आलींच आहेत. दोस्त राष्ट्रांना ऐन वेळी मदत करण्याचें बक्षीस म्हणून फ्रान्सच्या वांटणीला रंभादि अप्सरा येतील. चीनलाहि दोस्त राष्ट्रांत स्थान मिळालेले असल्यानें त्याला दिखाऊ मान म्हणून आणि त्या राष्ट्रानें सोसलेल्या दीर्घकालीन तापाच्या शमनाचा उपाय म्हणून त्याला चंद्र (अर्ध ) दिला जाईल. हिंदुस्थानच्या साहाय्याचा वारंवार उच्चार केला गेला आहे, तेव्हां त्यास अगदीच रिक्त हस्ताने परत पाठविणें अनुचित दिसेल म्हणून चौदा रत्नांतून राहिलेले 'शंख' हे आयुध हिंदुस्थानच्या वांटणीला येईल ! मोहिनी अमृत वांटणार अशा रीतीनें इतर रत्नांची विल्हेवाट लागेल. सर्वात मुख्य असें जें स्वातंत्र्य- रूपी 'अमृत' त्याची वाट काय असा प्रश्न पुढे येईलच. त्याचें उत्तर उघडच आहे. इतर रत्नांप्रमाणें 'अमृत' हें कांहीं एकट्याला देऊन टाकावयाचें रत्न नव्हे. 'अमृत' हे सर्वानाच यथाभाग द्यावयाचें तें वांटतांना कलह होऊं नये म्हणून तें वांटण्याचें काम मोहनीकडे दिले जाईल आणि देव व दैत्य यांच्या वेग- वेगळ्या पंक्ति बसवून क्रमाक्रमानें तें वांटण्यांत येईल. अर्थातच देवांच्या पंक्तींत वाढतां वाढतां तें संपून गेलें तर दैत्यांना नुसत्या वाटण्याच्या अक्षतांवर संतुष्ट राहावे लागेल. अशा रीतीनें आपली वंचना होऊं नये म्हणून इटाली, रुमानिया यांसारखें कांहीं राहू, केतू आपली रांग सोडून देवांचें रूप धारण करून त्यांच्या पंक्तीत बसूं पाहात आहेत; पण देवांच्या रांगेतले कांहीं सूर्य-चंद्र ही लबाडी उघ- डकीस आणतील. अशा रीतीनें पूर्वेतिहासाची पुनरावृत्ति याहि बाबतीत घडावया- चीच आहे. मात्र यांत मोहनी होऊन अमृत वांटण्याचा मान कोणाला मिळावयाचा