पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध अॅटॉमिक बाँबरूपी नारायणास्त्र प्रस्तुतच्या महायुद्धाचें पौराणिक समुद्रमंथनाच्या कथेशी असलेले काहीं साम्य वर वर्णिलें आहे. पण या आधुनिक समुद्रमंथनांतून दुसरें जें कालकूट विष निघालें लानें पूर्वीच्या हालाहल विषावर मात केली आहे. अॅटॉमिक बॉबरूपी भयंकर विषाचा जो नवा शोध या महायुद्धांतून निघाला तें विष मात्र महादेवहि पचवूं शकत नाही. या अस्त्राच्या सर्वसंहारकशक्तीपुढें जपानसारख्या क्षात्रवृत्तीच्या मानी राष्ट्रालाहि मान वाकवावी लागली. भारतीय महा- युद्धांत असाच प्रकार घडल्याचा जुना दाखला आहे. द्रोणाचार्याच्या वधा- नंतर संतापानें बेभान होऊन अश्वत्थाम्यानें नारायणास्त्र सोडलें. त्याचा प्रति- कार इतर कशानेंद्दि होऊं शकत नसल्यामुळे अर्जुनासह सर्व क्षत्रियांनी हातचें शस्त्र खाली ठेवून, नारायणास्त्राला वंदन करून आपले प्राण वांचविले. भीमदादाला असले वर्तन मान्य होईना ! त्यानें आपल्या हातची गदा खाली ठेवण्याचें नाकारलें, त्यामुळे त्याचा देह होरपळू लागला. श्रीकृष्णानें तें पाहून भीमाच्या रक्षणासाठी धांव घेतली आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांनी बळजबरीनें भीमाच्या हातून गदा काढून घेऊन, त्यांस नारायणास्त्रास वंदन करावयास भाग पाडलें. अशा रीतीनें पांडवांचा बचाव झाला; पण त्यांत क्षत्रियाला अनुचित अशी मानहानि सोसावी लागली. तथापि ज्या अस्त्राचा प्रतिकार होणें अशक्य आहे त्याच्यापुढे मान वाक- विण्याशिवाय गत्यंतर नाहीं हें जाणून अर्जुनासारख्या वीरानेंहि जो मार्ग अनुसरला तोच मार्ग जपान्यांनाहि पत्करावा लागला. भारतीय युद्धांत ज्याप्रमाणे प्रभु भुज उभारुनि म्हणे सैनिक हो शीघ्र आयुधें सोडा । यानावरून उतरा, कर या अस्त्रासि सर्वही जोडा ॥ अशा शब्दांनीं श्रीकृष्णानें पांडवचमूला शरण जाण्याची आज्ञा दिली. त्याच शब्दांत जपानच्या प्रभूनेंहि आपल्या सैनिकांस शस्त्र खाली ठेवून, युद्ध बंद कर ण्याची आज्ञा दिली आहे. क्षत्रियानें प्राण गेला तरी शस्त्र खाली ठेवू नये हें खरें; पण त्या नियमालाहि कांहीं अपवाद आहेत. अॅटॉमिक बाँब हें आधुनिक 'नारायणास्त्र'च असल्यानें या अपवादाचा फायदा घेऊन जपानी सम्राटानें तत्त्वतः मानहानि न होतां शरणागति पत्करण्याची संधि साधली. जपानी सैन्यांतहि नारा- यणास्त्राला न जुमानणारे कांहीं भीम आहेतच! त्यामुळेच तिकडे शरणागतीची घोषणा झाली तरी इकडे कांहीं ठिकाणी झटापट चालू आहेच. पण हे अपवाद लक्षांत घेण्याचे कारण नाहीं. या संबंधांत इतका विस्तार करण्याचें कारण एवढेच कीं, जपानची शरणागति जाहीर करण्यांत जी भाषा वापरली गेली व कांहीं ठिकाणीं तद्विरुद्ध वर्तन केले गेलें त्याची संगति लावतां न आल्यानें कित्येकांनी जपानवर रगेलपणाचा, तर कित्येकांनी कपटाचा आरोप केला; परंतु हे दोनह