पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कोणाच्या वांट्यास लक्ष्मी, कोणाच्या वांट्यास कौस्तुभ, तर कोणाच्या शंख येईल आणि शेवटीं अमृताच्या वांटणींतून पुनश्च कलह निर्माण होऊन तिसरे महायुद्ध कसें उद्भवेल याचें भविष्यकथन या लेखांत आहे. ] आपल्या पुराणांतून समुद्रमंथनाची कथा अतिशय चटकदार रीतीनें वर्णिली आहे. तींत सकृद्दर्शनीं अतिशयोक्ति व असंभवनीयता हे दोष आढळत असल्यानें, त्या कथेंत खोल शिरून तिचें रहस्य जाणण्याचा प्रयत्न सहसा केला जात नाहीं. या कारणास्तव त्या कथेचें मर्म सामान्य वाचकांना अपरिचित आहे. पण जर सूक्ष्म दृष्टीनें त्या कथेचें मर्म समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास, तिच्यांत राजकारणाची किती तरी गूढ तत्त्वें ग्रथित केलेली आढळतील. अन्योक्तिरूपाने सांगितलेल्या या पौराणिक कथेचें प्रस्तुतच्या महायुद्धाच्या घडामोडीशी विलक्षण साम्य आहे. त्या साम्याचें नीट विशीकरण केल्यास भूतकालांतील अनेक कोड्यांचा तर उलगडा होतोच; पण त्याबरोबरच भविष्यकालांतील अनेक परिणामांविषयी अनुमानें बांधतां येतात. अरयोऽपि हि संधेयाः सति कार्यार्थगौरवे या महायुद्धांत शत्रुमित्रांची उलटापालट इतक्या वेळां आणि इतक्या झटपट झाली की, कित्येक वेळां भविष्यकाळाबद्दल निश्चितपणे बोलणे अवघड होऊन बसलें. अशा वेळीं समुद्रमंथनाच्या कथेंतलें वरील सूत्र लक्षांत घेतलें असते, तर आपली दिशाभूल इतक्या वेळा झाली नसती. जशी समुद्रमंथनाच्या उद्योगाला सुरु- चात देवादैत्यांच्या समेटानेंच झाली तशीच दुसऱ्या महायुद्धाच्या हालचालीला सुरुवात रुसो-जर्मन समेटानेंच झाली आणि::समुद्रमंथनाचें पर्यवसान जसें देव- दानवांच्या झगड्यांत झालें; तसेंच नुकत्याच संपलेल्या महायुद्धाचें पर्यवसानहि, रशिया व जर्मनी यांच्या झगड्यांतच झालें. जर्मनी व रशिया एक झाले नसते, तर हें महायुद्ध मोठ्या प्रमाणावर पेटलेच नसतें आणि रशिया जर जर्मनीवर उलटला नसता तर जर्मनीचा आतां जसा सपशेल मोड झाला तसा मोड झालाच नसता आणि मग युरोपांतल्या छोट्या राष्ट्रांचें पुनरुज्जीवन होऊंच शकले नसतें. युरोपांतल्या दोन बड्या राष्ट्रांत जसा हा रंगपालट झाला, तसाच तो आशिया खंडांतल्या दोन राष्ट्रांतहि झाला. रशियानें जपानशीं तटस्थतेचा जो संधि केला त्याच्याच जोरावर जपाननें महायुद्धांत शस्त्र उपसले आणि रशिया 'मित्राचा शत्रु बनतांच जपानला आपल्या हातचें शस्त्र खाली ठेवावें लागलें. अशा रीतीनें पूर्व गोलार्धात आणि पश्चिम गोलार्धात दोनहि ठिकाणीं देवदानवांच्या समेटामुळे महायुद्धरूपी समुद्रमंथन सुरू झालें आणि त्यांच्यांत फूट पडल्यामुळेच समुद्रमंथन थांबलें. ठोकळ मानानें एथवर हें साम्य जुळलें. यापुढे पौराणिक कथें-