पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रत्नांच्या वांटणीची वाट काय ? ९१ बिनशर्त शरण यावयाला लावलें असें समाधान मानून घेतां घेईल, पण त्याबरोबरच जर्मनीचें पुढे काय करावयाचें या संबंधाच्या वाटाघाटीचें बीं रुजत घातलें गेल्यामुळे, जर्मनांनाहि आपण बिनशर्त शरण गेलों तरी आपल्यावरील आपत्तीला कांहीं विशिष्ट मर्यादा पडेल, असा विश्वास वाटेल अशी भाषा ठरावयाची आहे असे दिसतें. अग अग म्हशी, मला का नेशी ? जयसिंगानें शिवाजीला बिनशर्त शरण ये असेंच प्रथम बजाविलें. पण मागा- हून त्याचे २०च किल्ले घेऊन १२ किल्ले त्याच्याकडेच ठेविले व अवरंगजेबाची समजूत पाडली; त्याचप्रमाणे हल्लींच्या वाटाघाटींतूनहि रशियाचें समाधान होईल पण आपल्या अंगलट येणार नाहीं, अशा अटी ठरविण्यांत अँग्लो-अमेरिकन मुत्सद्दी गुंतले असावेत. जर्मनांचा तर आतां पुरता नाश झालाच आहे; तेव्हां ते आतां 'डर तो पीछे रही' असे म्हणण्याइतके निस्संग झाले आहेत. याचमुळे तर 'नंगेकू खुदाबी डरता' या म्हणीप्रमाणें अँग्लो-अमेरिकन हे जर्मनीला डरत आहेत. कारण जर्मनीनें काखा वर करून सगळा मुलूख रशियनांच्या हवाली केला, अथवा लवकर तह न झाल्यामुळे रशियनांनी हेंबुर्ग, कील यांसारखी बदर काबीज केलीं, तर उद्यां त्याला ती सोडावयाला कशीं लावावयाचीं? अर्थातच आतां जर्मनीनें लवकर शरण यावें यांतच अँग्लो-अमेरिकनांचा फायदा आहे. म्हणूनच 'अग, अग, म्हशी मला का नेशी' असे म्हणून म्हशीचें शेंपूट धरून घरांत शिरणायाप्रमाणे जर्मनीनें बिनशर्त शरणागति पत्करली असा पुकारा करून, युद्ध समाप्त झाल्याची घोषणा जितक्या त्वरित करता येईल तितकी ती अँग्लो-अमे- रिकनांना हवी आहे. अशी ही घोषणा आपल्या मनाजोगती घडवून आणण्यांत सध्या चर्चिल गुंतले आहेत. त्यांत त्यांचा डाव अधिक लवकर साधतो का रशियाचा साधतो, एवढेच काय तें पाहावयाचें. ( महायुद्धाच्या समुद्रमंथनांतून निघालेल्या रत्नांच्या वांटणीची वाट काय ? [ जपानची शरणागति जाहीर होऊन दुसऱ्या महायुद्धाची समाप्ति झाली. त्यानंतर तहाच्या वाटाघाटीला प्रारंभ झाला. या महायुद्धरूपी सागरमंथनांतून काय काय बाहेर आलें व त्याची वांटणी कशी होईल याविषयीं अगाऊ चर्चा करून समुद्रमंथनाच्या पौराणिक कथेच्या दृष्टान्तानें कोणाच्या वांट्यास हालाहल, ( केसरी, दि. २४ ऑगस्ट १९४५ )