पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध विली गेली आहे, याचें चक्षुवै सत्यं असें उत्तर मिळणें सद्यःस्थितीत अशक्य आहे. पण अनुमानानेंच ठरवावयाचें झाल्यास, बर्लिन शहरांत असतांनाच युद्धाच्या डोंबाळ्यांत त्याची आहुति पडली असावी, हेंच सर्वात अधिक संभवनीय आहे. इटालियनांप्रमाणे जर्मन लोक चंचल व विश्वासघातकी नसल्यानें मुसोलिनीप्रमाणें हिटलरचा जर्मनांच्या हातून घात झाला नसावा. मृत्यूला कवटाळण्याचा निश्चय झाला असतां त्याच वेळीं युद्धाचा वणवा जर बर्लिन शहरांत पसरलेला आहे, तर आत्महत्येचें निराळें साधन शोधण्याचें त्यास कारणच नव्हतें. बर्लिन सोडून इतरत्र जाऊन गनिमी काव्याचें युद्ध चालविण्यासारखी परिस्थितीहि राहिलेली नाहीं; यास्तव मृत्यूची खोटी अफवा पसरविण्यांत हंशील नाहीं; आणि शत्रूच्या हातीं सांपडून अवहेलना करून घ्यावयाची नाहीं हा तर हिटलरचा कृतनिश्चय; तेव्हां हिटलर बर्लिनमध्येंच राहून मरण पावला असावा हाच तर्क सुप्रतिष्ठित ठरतो. दि. ६ फेब्रुवारीच्या अंकांतच टिपूप्रमाणे हिटलर लढाईत मरणार आणि त्याच्या राज्या- च्या वांटण्या होणार असें भाकित केलें होतें, तेंच आज खरें ठरत आहे. विनशर्त शरणागतीच्या अटी ! 'बर्लिन पडल्यावर पुढे काय ' असा जो प्रश्न मागील अंकी विचारला होता त्याचें निश्चित उत्तर देण्याची परिस्थिति अद्यापि आलेली नाही. तथापि मागल्या आठवड्यांत पडद्याआड असलेल्या बऱ्याच गोष्टी या आठवड्यांत पडद्या- बाहेर आल्याने या संबंधांतले तर्क आतां अधिक साधार ठरण्याचा सभव आहे. स्वीडनचे काऊंट बर्नेडोट यांच्यामार्फत तद्दाचें कांहीं तरी सूत्र लागले असावें या- विषयीं तर शंकाच नाही. पण त्यांत अँग्लो-अमेरिकन आणि रशियन यांचें एकमत होत नाही म्हणून हें घोंगडे भिजत पडले आहे. बर्लिन सर केल्याखेरीज युद्ध समाप्त करणे रशियाला कमीपणाचें वाटत असल्यामुळे बर्लिन जिंकल्याची घोषणा होईपर्यंत रशिया मुग्ध राहणार हें स्वाभाविकच होतें. आतां बर्लिन हस्तगत झाल्याची घोषणा होऊन गेली आणि हिटलर कांहीं हाती लागत नाहीं हेंहि निश्चित झालें. तेव्हां यापुढे दिरंगाई होण्याचें वास्तविक कांहीं कारण नाहीं. बरें, तहाची रूपरेषा ठरण्याला वेळ लागतो म्हणावें, तर 'बिनशर्त शरणागतींत ' तद्दाची कलमें कांहींच नसावयाची, मग विचारविनिमय कसला व्हावयाचा व त्याला कालावधि तरी कशाला पाहिजे ! पण या बिनशर्त शरणागतींतच कांहीं तरी गोम असली पाहिजे; कारण बिनशर्त शरणागतीच्या अटी अद्यापि ठरल्या नाहीत, अशी एक तार मध्यंतरी गफलतीनें प्रसिद्ध झाली होती. त्यावरून वस्तुस्थिति अशी दिसते की, निर्गुण निराकार देवाचेंहि वर्णन करण्याला जशी कांही शब्दसंकेताची जरूरी असते, त्याप्रमाणें बिनशर्त शरणागतीच्या जाहीर घोषणेलाहि कांहीं शब्दसंकेताची जरूरी आहे. ज्या शब्दसंकेतामुळे दोस्त राष्ट्रांना आपण शत्रूला