पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध प्रस्थापित झाली नसून आधी देशाला संघटना पटून अनुयायी वाढले आणि मगच मुसोलिनीच्या हातीं सर्वाधिकार आला. सर्वाधिकार हाती आल्यावर त्यानें अॅबि- सीनियावर स्वारी करून सत्तेचा दुरुपयोग केला हें खरें. पण आजपर्यंत कोणत्या सत्ताधाऱ्यांनी परकीयांवर आक्रमण करावयाचें सोडलें आहे ! सर्वच सत्ताधारी जर एकाच माळेचे मणी आहेत, तर एका सत्ताधाऱ्याने दुसऱ्या सत्ताधाऱ्याला नांवें ठेवण्यांत हंशील काय ? तेंहि एक वेळ असो. इतर राष्ट्र मुसोलिनीला कांहींहि म्हणोत, त्यांच्या मतांची चिकित्सा आज आम्हांस कर्तव्य नाहीं. आमचें म्हणणे एवढेच की, ज्या इटालियन जनतेच्या हितासाठीं मुसोलिनी गेली ३५ वर्षे अहर्निश झटला, या इटालियनांनी तरी त्याच्या संबंधांत असला कृतघ्नपणा कराव- याचा नव्हता. ८८ दोन वर्षांपूर्वीच इटालियनांच्या चवचालपणाला भरती आली आणि त्यांनी मुसोलिनीविरुद्ध कट करून त्याला पकडून ठेवलें. त्या वेळी हिटलरच्या हातीं वासवी शक्ति होती म्हणून त्यानें मुसोलिनीची अद्भुत रीतीनें सुटका करविली व त्यामुळे त्या वेळचें संकट टळले. पण आतां स्वतः हिटलरवरच घोर प्रसंग येऊन ठेपल्यामुळे ज्यानें त्याने आपला रस्ता सुधारावा असे म्हणण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत उत्तर-इटालींत कम्यूनिस्टांचा वाढतां जोर पाहून त्याला आळा घालण्याकरितां फॅसिस्टांचा जो प्रयत्न चालला होता त्याला दुजोरा देण्यासाठी मुसोलिनी परत इटालींत आला असतां, कम्यूनिस्टांनीं त्याच्यावर अचानक छापा घालून त्याला पकडले आणि त्याच्या चौकशीचा नुसता देखावा देखील न करतां त्याला गोळ्या घालून ठार केलें. शेक्सपिअरनें 'ज्यूलिअस सीझर' या नाटकांत सीझरबद्दल अँटोनीच्या तोंडून जें वदविलें आहे तें मुसोलिनीच्या या अवस्थेशीं तंतोतंत जुळतें. अँटोनी म्हणतो, 'कालपर्यंत ज्यांचा शब्द खालीं पहूं देण्याची जगांत कोणाची प्राज्ञा नव्हती, तो स्वतःच आज असा धूळ खात पडला आहे.' 'माणसानें आयुष्यभर जें काय जगाचें भलें केले असेल, तें त्याच्या मरणाबरोबर विसरले जाते आणि त्याची वाईट कृति तेवढी लोक वारंवार उगाळीत बसतात !' 'तलवारीने त्याच्या छातीचें जितकें विदारण होऊं शकले नाहीं, तितकें देशभक्तीच्या नांवाखाली देश- द्रोह करणाऱ्यांच्या कृतघ्न्नतेनें त्याच्या छातीचें विदारण केले. 'जणुं काय शेक्स. पिअरनें मिलानच्या रस्त्यावर पडलेल्या मुसोलिनीच्या प्रेताकडे पाहूनच हें लिहिले असें वाचकांस वाटत नाहीं काय ? मिलानच्या नागरिकांची कृतघ्नता मुसोलिनीला ठार केल्यानंतर त्याच्या देहाची जी अवहेलना करण्यांत आली, ती अत्यंत किळसवाणी व गर्हणीय आहे. ज्या मिलान शहरावर त्याचें अत्यंत प्रेम होतें, PAT