पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धाचें अखेरचें पर्व आणि त्या सूडबुद्धीनें घडणारे अनेक किळसवाणे प्रकार दृष्टोत्पत्तीस येतात. महा- युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी हिटलरसंबंधी आणि मुसोलिनीसंबंधी कोणी कांहीं लिहिले नव्हतें असें नाहीं, पण त्यांची युद्धपूर्वकालीन शब्दचित्रे आणि युद्धकालीन शब्दचित्रे ह्रीं जोडून पाहिलीं, तर ही दोन्ही शब्दचित्रे एकाच व्यक्तीची अस- तील असें कोणी सहसा म्हणूं शकणार नाहीं. परंतु आमचा कटाक्ष प्रतिपक्षीयांच्या शाब्दिक दुर्वर्णनावर तितकासा नसून इटालियन लोकांच्या हातूनच मुसोलिनीचा शेवट ज्या रीतीनें केला गेला व त्याच्या मृत देहाची जी अवहेलना केली गेली त्यावर मुख्यतः आहे. ८७ गोल्डस्मिथचें मत - इटालियन लोकांइतके चंचल व उथळ बुद्धीचे लोक जगांत नसतील. गोल्ड- स्मिथनें पावणेदोनशे वर्षांपूर्वी त्यांचें जें वर्णन केले आहे ते आजच्या इटालिय नांनाहि लागू पडतें. गोल्डस्मिथ लिहितो, – “ Though grave yet triffling, zealous yet untrue; And even in penance planning sins a new “ हे इटालियन लोक गंभीर पण क्षुद्र बुद्धीचे, कळकळीचे पण बेइमानी आणि पापाचें प्रायश्चित्त घेतां घेतांनाच पुनः तें पाप करण्याचा संकल्प करणारे असे आहेत. " हा त्यांचा चवचालपणा जसा मागील युद्धांत तसाच या चाल युद्धांतहि दृग्गोचर झाला. त्यासंबंधाचा सविस्तर ऊद्दापोह करण्याची आज आवश्यकता नाहीं. तथापि मुसोलिनीशीं त्यांचें जें वर्तन झालें तेवढ्यापुरतांच आज विचार करावयाचा आहे. 27 मुसोलिनीची कामगिरी १९१० सालापासून मुसोलिनीनें इटालीच्या उत्कर्षासाठी देह झिजविला. क्लासवॉर, अव्हान्टी आणि पोपोलो डी इटालिया या वृत्तपत्रद्वारें आणि युटोपिया या मासिकांतून त्यानें इटालींत जागृति आणि संघटना केली. गेल्या महायुद्धांत इटालीनें सामील व्हावें याविषयींचा प्रयत्न मुसोलिनीनेंच केला. दोन वर्षे युद्ध रेंगाळतांच हल्लीच्याप्रमाणेच इटालियन सैन्यांत चलबिचल सुरू झाली व ते तह करून मोकळे होण्यास उतावीळ झाले. त्या वेळीं मुसोलिनीनेंच त्यांना आबरून धरलें. युद्धसमाप्तीनंतर सोशालिस्टांच्या आत्मघातकी चळवळीमुळे जेव्हां इटालींतील राज्यकारभाराला व उद्योगधंद्यांना खीळ बसण्याची वेळ आली, त्या वेळी मुसोलि- नीनें फॅसिस्ट संघटना करून इटालीचा बचाव केला. तत्त्वदृष्ट्या फॅसिझम, सोशालि- बोल्शेव्हिझम यांची तुलना करण्याचा यांत हेतु नाहीं; पण इटालियनांची त्यानें जी संघटना केली ती त्यांना पटली म्हणूनच त्यांचा बचाव झाला. प्रारंभी जे ४५ अनुयायी होते त्याचे लक्षावधि अनुयायी होण्याच्या वेळीं मुसोलिनीच्या हातीं सर्वाधिकार आलेला नव्हता. अर्थातच ही संघटना अधिकाराच्या जोरावर झम,