पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध झाला आहे. मात्र भारतीय युद्धांत गदापर्वानंतर सौप्तिक पर्व झालें तसें सौप्तिक पर्व चालू महायुद्धांतहि होणार कां गदापर्वानेंच या महायुद्धाची परिसमाप्ति होणार एवढें अनिश्चित आहे, उपमेंत केव्हांहि अक्षरशः सादृश्य पाहावयाचें नसतें. त्याप्र- माणे येथेंहि महाभारताची तंतोतंत पुनरावृत्ति झाली की काय हे पाहावयाचें नसलें तरी भीष्म-द्रोण-कर्णादिकांचा वध झाल्यानंतर देखील शल्याकडून पांडवांचा वध होईल, अशी जशी वेडी आशा कौरवांना वाटत होती, तशीच वेडी आशा जर्म- नांना अद्यापि वाटत असावी, असें अनुमान हिटलरच्या मृत्यूनंतरहि अॅडमिरल डोएनिट्झ याला सेनाधिपत्य देऊन जर्मनांनी युद्ध चालू ठेवले आहे यावरून निघते. मरणान्नानि वैराणि महाभारतीय युद्धांत व चालू महायुद्धांत आजपर्यंत अनेक प्रसंगी दर्शविल्या-- प्रमाणे पुष्कळच साम्य असले तरी कांहीं उद्वेगजनक ठळक विरोध आढळतात व त्यांचाच आज ऊहापोह करणे क्रमप्राप्त आहे. जर्मन राष्ट्राचा नेता हिटलर यानें महायुद्धाच्या ज्वाळा पेटविल्या आणि इटालियन राष्ट्राचा नेता जो मुसोलिनी त्यानें त्या आगीत तेल ओतल्यामुळे त्या ज्वाळा अधिक भडकल्या. यामुळे हिटलर व मुसोलिनी या उभयतांवर प्रतिपक्षीय राष्ट्रांचा राग असणे अगदी स्वाभाविक आहे; पण तो राग दर्शविण्याच्या प्रकारांतहि कांहीं माणुसकी राखावी लागते. भारतीय युद्धांत ती बहुतांशी राखली गेली होती.. अभिमन्यु मृत्युशय्येवर पडल्यावर जयद्रथानें त्याला लत्ताप्रहार केला असा प्रवाद आहे. एवढा अपवाद सोडल्यास शत्रुसंबंधानें कोठेंहि माणुसकीला न शोभेल, असा अनादर दर्शविल्याचें उदाहरण नाहीं. आणि जयद्रथाच्या या अधमपणाचें केवढे घोर प्रायश्चित्त त्यास तत्काळ मिळालें हेंहि सर्वश्रुतच आहे. जिवंतपणी समोरा-- समोर एकमेकांचे उघड अपराध बोलून दाखविण्यानें कांहीं माणुसकीला बाध येत नाहीं; पण मृत्यूनंतर तर सर्व अपकृत्यांवर पडदा पडला पाहिजे असे आर्य संस्कृति सांगते. याच कारणानें 'मरणान्तानि वैराणि' ही म्हण रूढ झाली आहे.. या रूढीला अनुसरूनच वालिवधानंतर सुप्रीवाला आणि रावणवधानंतर बिभी-- षणाला श्रीरामचंद्रानें आपल्या मृतबांधवांचा योग्य सन्मानपूर्वक अंत्यविधि करा- वयास आज्ञा केली. रामायणकालापासून ही नीति आतांपर्यंत आपल्याकडे पाळली जात आहे. मरणपूर्वकाणि वैराणि , पाश्चात्य राष्ट्रांत, निदान अलीकडे तर, ही नीति सुटत चालली असून ‘मरणान्तानि वैराणि' याच्याऐवजी कित्येक ठिकाणी तर 'मरणपूर्वकाणि वैराणि अशासारखा उलटा प्रकार सुरू झालेला दिसतो ! कारण शत्रूच्या मृत्यूनंतर त्याची भीति पूर्णपणें दूर झाल्यानें प्रतिपक्षाचा सूड उगविण्याच्या बुद्धीला चेव येतो