पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महायुद्धाचं अखेरचं पर्व आली असल्याची चिन्हें दिसतात खरी, परंतु त्यांच्यापुढे काळ्या समुद्रांतल्या काळकूटाचें भयानक दृश्य दिसूं लागल्यावर त्यांना निराशेचा चेव आल्यास व त्यांत पोलंडच्या लोकांच्या असंतोषाची भर पडल्यास युद्धाचें शेपूट किती लांबेल कोणी सांगावें ! हें कोर्डे काळच उकलून दाखवील मरणच पत्करावयाचें तर, शक्य तोंवर प्रतिकार कॅरूनच, कातें न पत्करावें, असा विचार गट्टी राष्ट्रांच्या मनांत येऊन गनिमी काव्याच्या प्रतिकारास प्रारंभ होईल. एवढासा ग्रीस देश, पण तोहि आवरतां आवरतां चर्चिलच्या नाकी नव आले. तेव्हां जर्मनी व जपान यांसारख्या राष्ट्रांना बिनशर्त शरण आणूं हे म्हणणें अक्षरशः खरं करून दाखविणे असंभवनीय दिसतें. कदाचित् वरकरणी अशी भाषा असली तरी 'नाझी पक्षाचा तेवढाच नाश आम्ही करूं, जर्मन जनतेशी कांही आमचें शत्रुत्व नाही', असा जो खुलासा केला गेला आहे, त्याच्यांत कांहीं कूस राखली गेली असल्यास 'नाझी जर्मनी बिनशर्त शरण आला' अशी प्रौढी मिरवूनहि सशर्त शरणागति स्वीकारण्यांत येईल. पण यासंबंधांत आजच निश्चित असे अनुमान कांहीं करतां येत नाहीं. सारांश, काळ्या समुद्रांतील मंथनांतून निघालेलें हें काळ- कूट जबर विषारी तर आहेच, पण दुसऱ्या अर्थानेंद्दि या ठरावांची अक्षरशः बजा- वणी करणे दोस्त राष्ट्रांना कितपत शक्य होईल, हेंहि एक काळाच्या पोटांत दडून बसलेले कोडेच आहे. तें कोडें कांळेच उकलून दाखवील, तेव्हां त्याचा उलगडा होईतोपर्यंत केले जाणारे तर्क व्यर्थच होत. महायुद्धांचें अखेरचें पर्व १७ [ महायुद्धाच्या भरतीचा जोर ओसरून ओहटीचाहि अखेरचा टप्पा -गांठण्याची वेळ आलेली पाहून महाभारतांतील शेवटच्या गदापवशी चालू महायुद्धाचें साम्य या लेखांत वर्णिले आहे. मुसोलिनीचा जो शोचनीय अंत झाला • त्यांत इटालियन लोकांनी दाखविलेल्या हलकट कृतघ्नतेचा धिक्कार केला आहे. आणि हिटलर हा अखेररस टिपू सुलतानाप्रमाणें लढतां लढतां मरेल पण शरण जाणार नाहीं, हें पूर्वीच वर्तावलेलें भाकित कसें खरें ठरलें, तें दिग्दर्शित केलें आहे.] महाभारतांतील युद्धांत भीष्म, द्रोण, कर्ण, शल्यादि पर्वे संपून शेवटच्या गंदापर्वाला प्रारंभ झाला. त्याप्रमाणेच चालू महायुद्धांतहि शेवटच्या पर्वाला प्रारंभ ( केसरी, दि. ४ मे १९४५ ) ..