पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध हे निर्बंध जाहीर झाल्यावर त्यामुळे युद्ध लांबणार नाहीं काय, असा प्रश्न पुनश्च विचारावासा वाटतो. कारण कोणतेंहि स्वाभिमानी राष्ट्र या अटी स्वखुषीनें आपल्या- वर लादून घेण्याला तयार होणार नाही आणि बळजबरीनें त्या त्याजवर लादा- वयाच्या म्हटल्यास दोस्त राष्ट्रांना त्यासाठी आणखी किती दिवस लढावें लागेल याचा नेम नाहीं. त्रिकुटाची ही काळकूटवजा घोषणा ऐकून 'जर्मन राष्ट्र नष्ट करा- वयाचा हा कट आहे', 'मानवतेला कलंक लावणारा हा घोर गुन्हा आहे', ‘असले आसुरी बेत आम्ही हाणून पाडूं' असले प्रतिध्वनि जर्मनींतून उमटू लागले आहेत. हतबल व हताश झालेल्या शत्रूच्या बडबडींत फारसें तथ्य नसतें हें खरें असले तरी जर्मनी आपला सगळा स्वाभिमान कोळून पिण्याइतका हतबल झाला आहे की काय याविषयी शंका घेण्याला जागा आहे. पोलंडचें भवितव्य काय ? ESP जर्मनी बोलूनचालून नंबर एकचें शत्रु-राष्ट्र; तेव्हां त्याच्या मानापमानाचा विचार दोस्त कशाला करीत बसतील ? पण पोलंड तर मित्र राष्ट्र. एवढेच नव्हे तर पोलंडचा टीचभर लचका जर्मनी तोडीत होता म्हणून तर इंग्लंडनें तलवार उप- सली. आणि आतां नुसता 'टीचभर'च नव्हे तर 'हातभर' प्रदेश रशिया बळका- वीत असतां इंग्लंड त्यास संमति कशी देणार ? परंतु दुर्बळांच्या शंकाकुशंकांना या जगांत भीक कोण घालणार ? रशियाच्या मदतीखेरीज जर्मनीचा पराजय कर- ण्याची धमक इंग्लंडच्या अंगांत असती तर इंग्लंडनें असला अवघड प्रसंग आपल्या- वर ओढवून घेतला नसता. तशी धमक नव्हती म्हणून तर रशियाच्या हाता- पाया पडून त्याला आपल्या बाजूला ओढला. त्याला रणसाहित्य देऊं केलें. इतर सर्व प्रकारें मदत केली आणि तोच रशिया आतां इतका शेर होऊन बसला को, चर्चिल व रूझवेल्ट या उभयतांचीहि स्टॅलिनला दुखविण्याची छाती होत नाहीं. यास्तव या त्रिकूटाच्या पत्रकांत पोलंडच्या बाबतीत असा निर्णय ठरविण्यांत आला आहे कीं, व्हर्सायच्या तहाच्या आधी लॉर्ड कर्झन यांनी पोलंड व रशिया यांच्यांत जीसीमा ठरविली होती तीच पूर्वेकडील सीमा पोलंडनें मान्य करावी. यामुळे पोलंडचें जें नुकसान होईल तें भरून काढण्यासाठी पोलंडला अत्तरेला आणि पश्चिमेला जर्मनीच्या ताब्यांतला नवा प्रांत देण्यांत येईल. याचा अर्थ असा की, पोलिश लोकांच्या पूर्वापार वस्तीचा बराचसा मुलुख रशियाच्या राज्यांत सामील होणार आणि जर्मन लोकवस्तीचा भांडखोर प्रांत पोलंडांत सामील केला जाणार ! व त्याचबरोबर इंग्लंडला व अमेरिकेला इंग्लंडमध्ये येऊन राहिलेलें पोलिश सरकार अमान्य करून रशियाच्या पंखाखालच्या लुब्लिन कमिटीला पोलिश सर- कार म्हणून मान द्यावा लागणार! यांत इंग्लंड-अमेरिका यांचा सपशेल अपमान आहेच; पण त्याचें शल्य थोडेसें बोथट करण्यासाठी असें ठरविण्यांत आलें कीं, लुब्लिन