पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काळ्या समुद्रांतले काळकूट ७९ १२ फेब्रुवारीपर्यंत सात दिवस विचारविनिमय करून जे निर्णय घेतले ते जर्मनी व जपान या शत्रु-राष्ट्रांना 'काळकूट' विषासारखे मारक होणार हें दर्श- 'विण्याकरितां 'काळकूट' हा शब्द योजिला आहे. शिवाय या निर्णयांची बजावणी केव्हां, कशी व्हावयाची आणि त्या बजावणींत कोणत्या नव्या भानगडी उपस्थित होतील हें एक काळाच्या पोटांतलें कूट म्हणजे कोडेंच असल्यानें त्या अर्थानेंहि या निर्णयाला 'काळकूट' असा शब्द लागू होतो. अशा दुहेरी अर्थानें 'काळकूट' हा शब्द योजून, श्रेष्ठीत्रयांच्या या वाटाघाटीचा महायुद्धावर यापुढें काय परिणाम होईल याचा विचार या लेखांत केला आहे. ] काळकूट शब्दाचा दुहेरी अर्थ कै. हरीभाऊ आपटे यांनी 'कालकूट' नांवाची आपली सुप्रसिद्ध कादंबरी लिहिली त्या वेळी त्या कादंबरीच्या प्रास्ताविक भागांत 'काळकूट' या शब्दाचें निरुक्त करतांना त्यांनीं तें दोन प्रकारांनी केलें होतें. देव-दैत्यांच्या समुद्रमंथनांतून निघालेले व जगाचा संहार करूं पाहणारें 'काळकूट' विष असा त्या शब्दाचा रूढ अर्थ तर उघडच आहे; पण त्या कादंबरीत वर्णिलेला जो अद्भुत प्रसंग तो कसा घडला आणि त्याचा पुढे परिणाम काय होणार, हें एक ‘ काळाच्या पोटांत दडलेलें कूट' म्हणजे 'कोडें'च आहे असा त्या 'काळकूट' शब्दाचा जो दुसरा अर्थ त्यांनी दिला तो विशेष मार्मिक होय. प्रस्तुत प्रसंगालाहि हे दोन्ही अर्थ यथार्थतेनें लागूं पडत असल्यामुळे आम्ही वरील मथळ्यांतला 'काळकूट' हा शब्द असाच दुहेरी अर्थाने वापरला आहे. काळ्या समुद्राच्या कांठी एकत्र जमलेल्या त्रिराष्ट्र प्रमुखांच्या विचारमंथनांतून जें 'कालकूट' निर्माण झालें तें जर्मनी व जपान या देशांतील नाझी पक्षांचा संहार करूं पाहणारें जहर विष आहे, यांत तर शंकाच नाहीं; पण यां विचारमंथनाचा जो निष्कर्ष निघाला त्याचा भावी घडा- मोडींवर आणि जागतिक शांततेवर कसा काय परिणाम घडणार हें एक काळाच्या पोटांत दडलेलें कोडेंच आहे, त्यांतहि शंका नाहीं. अर्थातच त्रिराष्ट्र प्रमुखांच्या निर्णयाचा वरील दोन्ही अर्थानीं विचार करणे क्रमप्राप्त आहे. माल्टा ते याल्टा मार्शल स्टॅॉलिन हा आपलें रणक्षेत्र सोडून दूरवर जाऊं इच्छित नसल्यामुळे रूझवेल्ट आणि चर्चिल हे आपआपल्या राजधान्या सोडून प्रथम याल्टा बेटांत पर- स्परांस भेटले. तेथें प्रथम उभयतांचा खल होऊन त्यांत आपले कोणते मुद्दे स्टॅलि- नला मान्य करावयाला लावावयाचे आणि स्टॅलिनच्या कोणत्या मुद्द्यांपुढे आपण किती मान वांकवावयाची याची रंगीत तालीम होऊन नंतर हे दोघे राष्ट्रप्रमुख