पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध येणार आहे की, यापुढे रूझवेल्ट व स्टॅलिन यांच्यांतच मतभेद झाला, तर चर्चिल कोणाचा पाठपुरावा करणार ? रूझवेल्टचा पाठपुरावा करावा, तर साम्राज्यांतील सर्व घटकांना स्वातंत्र्य द्यावें लागणार आणि स्टॅलिनचा पाठपुरावा करावा तर युरोपांतील बोल्शेव्हिझमची लाट इंग्लंडवर येऊन आदळणार ! या दोहोंतून वाट काढण्यासाठी ग्रीस, स्पेन, फ्रान्स व इटाली या चार राष्ट्रांशी त्याची कारस्थानें चालू आहेत. जर्मनी व जपान हीं जी उलट पक्षाची राष्ट्र, त्यांच्या प्रमुखांच्यां तोंडाला सध्यां खीळच बसली आहे. म्यूनिचच्या चढाईचा वार्षिक दिन आज- पर्यंत कधीं हिटलरच्या भाषणाशिवाय सुना गेला नव्हता; पण यंदा त्या दिवशीं तर त्याचें भाषण झालें नाहींच; पण दि. १२ ला नाझी सैनिकांनी निष्ठेची शपथ घेतली, त्या वेळींहि हिटलरचें प्रत्यक्ष भाषण न होतां तें वाचून दाखविण्यांत आलें. फिलिपाईन बेटावरची अमेरिकनांची चढाई आणि फिलिपाइन्सनजीक झालेली जपानी नाविक दलाची मोठी हानि, यामुळे जपानी पंतप्रधानांनाहि आपल्या जन- तेच्या चिंतेचें निराकरण कसे करावें याची पंचाईत पडली आहे. विजय सुलभ नाहीं ! सारांश, युद्धकारणांत व राजकारणांतहि गट्टी राष्ट्रांवर मोठाच पेंच येऊन पडला आहे; आणि दोस्त राष्ट्रांच्या नेत्यांचे बाहु व ओंठ फुरफुरत आहेत. तथापि या वरवरच्या देखाव्यांच्या आंत खोल शिरून पाहिल्यास दोस्त राष्ट्रांनाहि आपला विजय सुलभ आहे असें वाटेनासें झालें आहे; आणि जर्मनीला तर चालू हिवाळा हा आपला पराभव टाळण्याला ढालीसारखा उपयोगी पडेल असे वाटत आहे. या ढालीचा उपयोग जर्मनी किती कौशल्यानें करून घेईल, त्यावर भावी लढ्यांतील जयापजयाचे हेलकावे अवलंबून राहतील. काळ्या समुद्रांत काळकूट [ जर्मनीविरुद्ध उघडलेली तिसरी आघाडी बरीच यशस्वी होऊन जर्मनी- च्या नाड्या आंखडत आल्यावर दोस्त राष्ट्रांचे तिघे श्रेष्ठी, शत्रु-राष्ट्रांची अखेरची विल्हेवाट लावण्याची याजना आंखण्यासाठीं याल्टा येथें जमले. याल्टा है बंदर काळ्या समुद्रांतील कायमिया द्वीपकल्पांतलें एक हवाशीर ठाणें आहे. त्या ठिकाणीं रूझव्हेल्ट, चर्चिल व स्टॅलिन हें त्रिकूट एकत्र येऊन त्यांनीं दि. ५ ते ( केसरी, दि. १६ फेब्रुवारी १९४५ )