पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० १९२८ च्या बार्डोलीच्या सत्याग्रहांत आणि १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहांत केसरीचें पुढारीपण नव्हतें. होमरूलच्या चळवळीत किंवा स्वराज्य पक्षाच्या चळ- वळीत जसें अनुक्रमें टिळक आणि केळकर यांचें पुढारीपण होतें तसें १९२८ व १९.३० या सालांत नसतांनाहि बार्डोलीच्या सत्याग्रहावरील किंवा मिठाच्या सत्याग्रहावरील जे करंदीकरांचे अग्रलेख या लेखसंग्रहांत आलेले आहेत त्यांमध्यें राष्ट्रीय जीवनाशी तादात्म्य ठेवूनच करंदीकरांची लेखणी चाललेली दिसून येईल. टिळक व खाडिलकर यांच्याप्रमाणेच करंदीकरांच्या लिखाणांत सडेतोडपणा आहे. टिळकांप्रमाणेच महाभारताची किंवा इतर संस्कृत वचनें देण्याची प्रवृत्ति करंदी- करांची आहे. टिळक-खाडिलकर हे अग्रलेखांचे मथळे समर्पक, सुटसुटीत किंवा सुलिष्ट करण्यासाठी विशेष काळजी घेत नसत. स्वाभाविकपणें तशी रचना कधीं कधीं येई ही गोष्ट निराळी. करंदीकर यांच्या मथळ्यांत ही काळजी अधिक. दिसून येते. सर्व लेखाचें स्वरूप थोडक्या शब्दांत समर्पकपणानें प्रथित व्हावें असा प्रयत्न करंदीकर यांच्या मथळ्यांत अधिक दिसतो. लिहिण्याच्या सडेतोडपणांत खाडिलकरांप्रमाणेंच करंदीकरांनींहि टिळकांचा आदर्श पुढे ठेवलेला आहे. विषय समजून देण्याची हातोटी हा करंदीकरांचा विशेष आहे. महायुद्धामधील मोक्याचे प्रसंग, त्यांतील स्वारस्य ध्यानांत येईल अशा पद्धतीनें, ज्या अग्रलेखांतून करंदीकर यांनी मांडले आहेत ते अग्रलेख अतिशय नमुनेदार आहेत. १९४० ते १९४४ पर्यंतच्या काळांत या अग्रलेखांमुळे वाचक लढाईतील मोक्याचा प्रसंग आला असतां या वेळी केसरीचा अग्रलेख पाहिजे अशी अपेक्षा करीत आणि ती अपेक्षा नेमकी आणि संपूर्णपणें तृप्त करणारे अग्रलेख एकामागून एक या चार वर्षात श्री. करंदीकर यांनी लिहिले आहेत. किंबहुना करंदीकर यांच्या संपादकीय कौशल्याची आणि कर्तृत्वाची शीग या चार वर्षांतील लिखाणांत पाहावयास सांपडते. एका बाजूला दैनिकांतून त्रोटकपणे आणि तुटकपणे येणाऱ्या महायुद्धाच्या वार्ता, अनेक ठिकाणांतून एकत्र संकलित करून करंदीकरांच्या मार्गदर्शकत्वानें काम करणाऱ्या दुय्यम संपादकांकडून केसरींत दिल्या जात असत. तुटक वार्तानी भांबावून गेलेल्या वाचकांना त्यांतील निष्कर्ष लेखरूपानें केसरींत सतत दिला गेला. लोकांना तो वाचल्याविना त्या वेळी समाधान वाटत नसे. रणक्षेत्रावर चाललेल्या घडामोडींचें संगतवार सूत्र जुळविणाऱ्या या पार्श्वभूमीवर युद्धाला कलाटणी देण्यासारख्या घ घडण्याच्या प्रसंगी जे अप्रलेख करंदीकर लिहीत त्यांवर जिज्ञासू वाचकांच्या उज्या पडत. केसरी उघडल्याबरोबर प्रथम युद्धवार्ता वाचणें आणि नंतर अग्रलेख या. संबंधीच आहे की काय हे पाहणे, असा या काळांत हजारों वाचकांचा क्रम झालेला होता. गांवोगांव कित्येक मित्रमंडळींच्या कंपूंमध्यें केसरींतील युद्धवार्तेचें नित्य सामुदायिक वाचन त्या वेळी केले जात असे. महायुद्ध आणि त्यांतील घडामोडी