पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पराजयाला हिवाळा आड त्याच्यावरचा विश्वास उडाला आहे. त्याला पुरविलेली युद्धसामुग्री जपानविरुद्ध उपयोगांत आणण्याऐवजी आपल्या देशांतील प्रतिस्पर्ध्याशी लढण्यांत तिचा विनि- योग केला जातो, असा त्याजवर इतर दोस्तांचा आरोप आहे. त्यामुळे त्याला अमेरिकेकडून यापुढे पूर्वीसारखें साहाय्य मिळेल असें दिसत नाहीं. दोस्तांच्या प्रमुखांची विचारसरणी दोस्त राष्ट्र चतुष्टयांच्या प्रमुखांची मनःस्थिति वर वर्णिल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची असल्याने तिचे वेगवेगळे प्रतिबिंबहि त्यांच्या भाषणांत उमटून येतें. योगायोग असा आला की, एकाच आठवड्यांत कांहीं विशिष्ट प्रसंगामुळे प्रत्येकाला भाषण करण्याची संधि मिळाली. रूझवेल्ट यांनी निवडणूक जिंकल्यामुळे आपल्या विजयाबद्दल राष्ट्राचे आभार मानतांना स्वातंत्र्यविरोधी गट्टी-राष्ट्रांचा आपण पुरेपूर समाचार कसा घेऊं, याचें त्यांनी दिग्दर्शन केले. मात्र त्या स्वातंत्र्याचा पददलित राष्ट्रांना कितपत लाभ होईल, हे पाहावयाचें आहे. स्टॅलिननें रशियन क्रांतीच्या स्मृतिदिनानिमित्त भाषण केले आणि त्यांत बर्लिनवर लाल निशाण फडकविण्याची मनीषा व्यक्त केली. परंतु रशियाचा वाढतां विजय शेजारच्या राष्ट्रांना स्वातंत्र्य- दायक होईल कां नाही, याची शंकाच वाटते. पोलंडबद्दलची त्याची अढी कायम आहे. रुमानियाविरुद्ध त्याची तक्रार चालूच आहे. फ्रान्समधलें नवें सरकार रशि- यनांना नीट वागवीत नाही, असा त्याचा दावा आहे. बिचाऱ्या इराणला तेलाच्या खाणीसंबंधांत धाकदपटशा चालू आहे आणि चीनमधील सरकार तेथील कम्यूनि- स्टांशीं सहकार्य करीत नाही, म्हणून चिनांत ढवळाढवळ करण्याचा त्याचा विचार दिसतो. त्याची पूर्वसूचना म्हणून जपानविरुद्ध प्रचार रशियन पत्रांतून चालू आहे. जपानच्या विरुद्ध बनत चाललेलें रशियांतले वातावरण आणि बर्लिनवर होणारी रशियाची भावी स्वारी या दुहेरी संकटाची जाणीव झाल्यानेंच जपाननें बर्लिन- मधली आपली वकिलात गुंडाळून ती स्वीडनमध्यें नेऊन ठेवली असावी. इकडे रूझवेल्ट, तिकडे स्टॅलिन ७७ चर्चिलला आपल्या भाषणांत बढाई मारण्यासारखा कोणताच विषय आणतां आला नाहीं. तरी पण दि. ९ नोव्हेंबरला लंडनच्या मेयॉरच्या मेजवानीच्या दिवशीं प्रधानानें भाषण करण्याचा संप्रदायच असल्यानें त्याला बोलावें लागलें. त्यांत त्यानें एवढीच प्रौढी मिरविली कीं, रूझवेल्टचा नव्या निवडणुकीत जय झाल्याने आतां रूझवेल्ट व स्टॅलिन यांची एकत्र गांठ घेण्याची संधि लवकरच लाभेल. एवंच रणक्षेत्रावर ज्याप्रमाणें रशिया व अमेरिका यांच्या धोरणानेंच इंग्लंडला पाऊल टाकावें लागतें, त्याप्रमाणें राजकारणांतहि स्टॅलिन व रूझवेल्ट यांच्या तंत्रानेंच चर्चिलला राबावें लागणार. पण त्यांतहि एक अडचण अशी