पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध येतात त्यांची कामे बंद पडली नाहींत असे दिसतें, आणि हिवाळ्यांतलें धुक्याचें वातावरण तर वैमानिक हल्ल्यांना अनकूल नसल्यामुळे हिवाळ्यांत हे हल्ले वाढण्या- ऐवजी कमीच होतील आणि जर्मनीला आपली शस्त्रनिर्मिति वाढवितां येईल. स्फोटक बाणांचा मारा वाढणार या शस्त्रनिर्मितींत जर्मनीचा मुख्य भर सध्यां तरी “ रॉकेट बॉम्ब्स " ( स्फोटक बाण ) यांच्यावर दिसतो. हे स्फोटक बाण इतक्या जलद उडतात की, त्यांचा आवाज ऐकूं येण्यापूर्वीच त्यांचा प्रत्यक्ष प्रहार होऊन जातो ! यामुळे स्फोटक बाण सुटल्याचा इषारा देऊन जनतेला सावध करतां येत नाहीं. या स्फोटक बाणांचा मारा इंग्लंडवर तर चालू आहेच, पण यापुढें तो बेल्जम आणि फ्रान्स- मधील दोस्तांच्या छावण्यांवरहि चालू होईल. इंग्लंडवर जसा हा स्फोटक बाणांचा प्रहार चालू आहे तसा तो रशियावर कां चालू नाहीं अशी शंका कित्येकांकडून विचारली जाते. पण रशियाचा मुलूख इतका अफाट आहे की, त्याच्या कारखान्यांचें, लोकवस्तीचें आणि छावण्यांचेंहि केन्द्रीकरण इंग्लंडांतल्याप्रमाणे झालेले नाही, यास्तव रशियावर फेकलेले स्फोटक बाण कोठें तरी ओसाड माळावर पडून फुकट जावयाचे आणि अशी उधळपट्टी करण्याइतकी जर्मनीची परिस्थिति नाहीं, यास्तव इंग्लंडच्या आणि फ्रान्स-बेल्जमच्या दाट वस्तीवरच सध्यां त्यांचा मारा चालू आहे. रशिया जर बुडापेस्टवरून व्हिएन्नावर चालून येऊं लागेल तर त्यालाहि त्या वेळी या बाणांचा प्रसाद मिळाल्याखेरीज राहणार नाही. राजकीय परिस्थितींत वसंत ऋतु असो. प्रत्यक्ष युद्धपरिस्थितीचा हा विचार झाला. त्याबरोबरच राजकीय परिस्थितीचाहि विचार होणें जरूर आहे. राजकीय बाबतींत मात्र दोस्त राष्ट्र हिंवाळ्यांतील गारठ्यांनी कुडकुडत नसून वसंत ऋतूनें हर्षोत्फुल्ल झालेली दिसतात. प्रे. रूझवेल्ट यांनीं निवडणूक जिंकल्यामुळे अमेरिकेचा युद्धविषयक निश्चय व्यक्त झाला आणि गट्टी राष्ट्रांचा निःपात करण्याचे आपलें धोरण नेटानें पुढे चालविण्यास रूझवेल्टचे हात मोकळे झाले. मार्शल स्टॅलिन हा तर पूर्वीपासूनच निरंकुश सर्वा- धिकारी आहे. त्यांतून फिन्लंड, रुमानिया, बल्गेरिया इतक्या राष्ट्रांना वांकवून त्यांच्याकडून आपल्या मनाजोगते तह करून घेतल्यामुळे रशियन सैनिकांची त्याच्यावरची निष्ठा द्विगुणित झाली आहे. ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांना मात्र तसा कांहीं नवा पराक्रम दाखवून आपली लोकप्रियता वाढविण्याची संधि मिळाली नाहीं; तरी पण चर्चिलला इंग्लंडांत दुसरा कोणी प्रतिस्पर्धी नसल्यामुळे तो आपले स्थान संभाळून आहे व पार्लमेंटची निवडणूक एक वर्ष पुढे ढकलून, मजूर पक्षाशी होणारी घासाघीस तूर्त त्यानें थांबविली आहे. बिचारा चांग-कै-शेक याची स्थिति मात्र अगदींच केविलवाणी झाली आहे. अमेरिकन राष्ट्राचा