पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पराजयाला हिवाळा आड ७५ आहे की, जर्मनीजवळ अद्यापि २५० डिव्हिजन्स इतकें सैन्य जय्यत तयार आहे. त्यांतील ११८ डिव्हिजन्स पूर्व-आघाडीवर आहेत. ७०-८० डिव्हिजन्स पश्चिम- आघाडीवर आहेत आणि बाकीच्या इटाली, बाल्कन्स, नॉर्वे, डेन्मार्क, हॉलंड इत्यादि भागांत आहेत. हे सगळेंच सैन्य करोल व कसलेले आहे असें नाहीं; तथापि त्यांतल्या ज्या निवडक तुफान पलटणी आहेत त्यांचा उपयोग केव्हां कोठें करा- वयाचा हे जाणण्यांत जर्मन रणपंडित पूर्ण वाकबगार आहेत. त्यामुळे पूर्व-प्रशि- याकडील रशियाचा लोंढा अनावर झाल्यास या तुफान पलटणी त्या दिशेला रवाना होतात व शत्रुला तडाखा देऊन शत्रुसैन्याची अमूप हानि करून त्याची प्रगति थोपवून धरतात व परत येतात. इकडे आखेन, आन्हींम इत्यादि भागांत तसाच बिकट प्रसंग आला तर त्या तुफानी पलटणींची रवानगी त्या दिशेनें केली जाते. आणि दोस्तांच्या चढाईला पायबंद बसतोच. या तुफानी पलटणी एकाच ठिकाणी सतत लढत व प्रतिकार करीत ठेवल्या जात नाहीत, त्यामुळे त्यांची हानि विशेष होत नाहीं आणि या कजाग पलटणींनीं शत्रूची हड्डी नरम केल्यावर पुढची काम- गिरी इतर मामुली पलटणींवर सोपविली जात असल्यामुळे या करोल पलटणींना विश्रांतीहि भरपूर मिळते. जर्मनीनें ठिकठिकाणचे पेंचप्रसंग सोडविण्याकरितां आपल्या सैन्याचा उप- योग कसा कौशल्यानें चालविला आहे याचें वर दिलेले वर्णन आमच्या पदरचें नसून दोस्त गोटांतील ती अधिकृत मल्लिनाथी असल्याने ती खरी मानून चालण्यास हर- कत नाहीं. या मल्लिनाथीवरून असा निष्कर्ष निघतो की, जर्मनीच्या निवडक तुफानी पलटणींशी टक्कर देण्यास दोस्तांचे सामान्य सैनिक समर्थ नाहींत. तथापि एकाच- वेळीं अनेक बाजूंना पेंचप्रसंग निर्माण झाल्यास जर्मनी तरी आपल्या तुफानी सैन्याला किती धांवाघांव करावयास लावू शकेल ? पण दोस्तांच्या सर्व आघाड्यांवरील निकराच्या चढाईचीं वेळापत्रकें एकमेकाशीं जमत नसल्यानेंच जर्मनीला असा डाव खेळतां येणें शक्य होत असावें, असाहि निष्कर्ष त्यांतून निघतो. तें कसेंहि असो. तूर्त तरी जर्मनी जरी सर्व बाजूंनी वेढला गेला असला तरी उंबरठ्याच्या आंत घुसून त्याच्या घरांतच काटाकाटी सुरू करण्याची वेळ अद्यापि आली नाहीं व हिवाळा संपेपर्यंत ती येईलसें दिसत नाहीं. तसे झाल्यास हिंवा- ळ्यांत जर्मनी आपल्या रणसामुग्रीच्या निर्मितीची वाढ करूं शकेल की काय, हाच काय तो मुख्य प्रश्न आहे. वैमानिक हल्ल्यांमुळे जर्मनींतले युद्ध-सहाय्यक कारखाने मोडकळीस आल्याची वर्णनें आपण वारंवार वाचतों. तरी पण अद्यापि त्याचा दुष्प- रिणाम जर्मनीला रणांगणावर फारसा जाणवू लागल्याची चिन्हें दिसत नाहींत. विमा- नांची संख्या जर्मनीला अपुरसपेंडते आणि पाणबुड्यांची निर्मिति खुंटली, एवढा अ परिणाम निश्चित दिसती मात्र जे कारखाने पृथ्वीच्या पोटांत गुप्तपणे चालवित दावल नं

        • LE