पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध पाठपुरावा करणे जिवावर येईल. हंगेरीवरील स्वारीत रुमानियाच्या साहाय्याची रशियाला अत्यंत आवश्यकता भासणार हे उघड आहे, आणि रशियाच्या अपेक्षे- प्रमाणे त्याला रुमानियाकडून मदत पोचत नसावी. म्हणूनच रशियानें रुमानिया आपल्या तहाच्या अटी पाळीत नाहीं अशी कुरकुर चालविली आहे. त्यांतूनहि रशियानें पराक्रमाची शर्थ करून बुडापेस्ट हस्तगत केले तरी तेथून व्हिएन्नावर चाल करून जाणे सोपें नाहीं. बुडापेस्ट आणि व्हिएन्ना यांच्या दरम्यान दऱ्याखोरीं, घनदाट अरण्य आणि नद्या यांचें जाळे असून जर्मनीला व्हिएन्नाचे संरक्षण कर ण्याला नैसर्गिक अनुकूलता पुष्कळच आहे. तेव्हां बुडापेस्ट गेलें कीं, त्याच्या पाठो- पाठ व्हिएन्नाहि लगेंच जाईल असे मानण्यांत अर्थ नाहीं. ७४ दोस्तांचा खरा डाव इटांलींतील दोस्त सैन्याची प्रगति केवळ स्थानिक महत्त्वाची बाब आहे. तिचा जर्मनीच्या मर्मावर घाव घालण्याचा प्रत्यक्ष उपयोग होऊं शकणार नाहीं, यास्तव तो विचार तूर्त सोडून देऊं. त्यानंतरचें महत्त्वाचें रणक्षेत्र म्हणजे नान्सी ते बेलफोर्ट ही सरहद्द होय. या बाजूनें दोस्त सैन्याची चढाई होत असल्याच्या वार्ता, ही नवीन आघाडी उघडली गेली तेव्हां, बऱ्याच पसरल्या होत्या. परंतु हा भूभाग आधुनिक रणगाड्यांच्या हालचालीला इतका प्रतिकूल आहे की, त्या बाजूनें प्रथम जर्मनीत घुसणें शक्य दिसत नाहीं. नान्सीच्या उत्तरेकडचा मेट्झ- पर्यंतचा जो प्रदेश आहे त्या रणक्षेत्रांत सभ्यां जोराची हालचाल सुरू आहे. दोस्तांचें सैन्य मेट्झपासून अवघ्या पांच मैलांवर आले असल्याचें ताजें वृत्त आहे. तरी पण या बाजूची चढाई ही जर्मनीचा मोठा सेनाविभाग गुंतवून ठेवण्याच्या इराद्यानेंच असली पाहिजे. बोलोन, लग्झेंबर्ग, मेट्झ, नान्सी, बेलफोर्ट या बाजूनें चढाईची हुलकावणी दाखवून जर्मनीचा मोठा सेनाविभाग इकडे आकर्षून घ्याव- याचा आणि नायमेजेन, आन्हेंमन या बाजूनें खरी चढाई करावयाची, असाच दोस्त सेनापतींचा खरा डाव असला पाहिजे. अशा प्रकारें पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूंनीं एकदम चढाई सुरू झाल्यास जर्मनीचा प्रतिकार ढासळेल अशी दोस्त राष्ट्रांची कांहीं महिन्यापूर्वी समजूत होती. पण जसजसा जर्मनीचा प्रतिकार ढिला पडण्याऐवजी तो अधिकाधिक निकराचा होत चालला, तसतसी हिवाळ्याच्या आंत पश्चिम आघाडीवरील लढाई आटोप- ण्याची आशा मावळत चालली आणि आतां तर प्रत्यक्ष हिंवाळा ठेपलाच. अर्था- तच हिंवाळ्याच्या पूर्वीचे चढाईचे बेत हिवाळ्यांत उपयोगी पडणार नसल्यानें दोस्त सेनानींना आपल्या चढाईच्या योजनांची फेरतपासणी करावी लागेल. जर्मनीच्या तुफान पलटणी अशी फेरतपासणी करीत असतां दोस्त राष्ट्रांच्या युद्धश्रेष्ठींना आढळून आले