पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पराजयाला हिंवाळा आड ७३ निश्चिति वाटूं लागल्यामुळे त्यांच्या मागच्या विवंचनेचा ससेमिरा सुटला आहे. त्यांतल्या त्यांत रूझव्हेल्ट व स्टॅलिन यांच्या भाषणांतून विजयोन्मादाच्या लाटा आतांच उसळं लागल्या आहेत. तरी पण हिंवाळा संपेपर्यंत विशेष महत्त्वाच्या घडामोडी घडणार नाहीत आणि गही राष्ट्र कितााह हतबल झाली असली तरी अखेरचा संपूर्ण विजय दोस्त राष्ट्रांना वाटतो तितका सुलभतेनें मिळणार नाहीं.] दुर्धर रोगानें पछाडलेला मनुष्य रोगाचें समूळ उच्चाटन करण्याची आशा खालावत चालली म्हणजे ज्याप्रमाणें मृत्यूची वेळ कशी लांबणीवर पडेल याच्या योजनेंत गढलेला असतो, त्याप्रमाणें जर्मनीहि आपल्या पराजयाची घटका लांबणीवर कशी ढकलतां येईल या विचारांत गढलेला असून, हिवाळ्याचे आगमन हें एक युद्ध मंदावण्याचें व पराभवाची वेळ दुरावण्याचे साधन त्याच्या उपयोगी पडत आहे. दिवाळ्याचा विशेष प्रभाव नॉर्वे, बाल्टिक प्रदेश, पूर्व-प्रशिया, कार्पेथियन पर्वत व झेकोस्लोव्हाकिया या भागांत दिसणार असून, पश्चिम आघाडीपैकी दक्षिण-विभाग आणि उत्तर-इटाली या प्रदेशांतहि थंडीच्या कडाक्यांत रणधुमाळी चालविणें दुर्घट होईल. याचा परिणाम असा होईल की, आतांपर्यंत जर्मनीला आपल्या शत्रूचा प्रतिकार करण्याला जो जिवापाड आटापिटा करावा लागत होता ते परिश्रम कांहीं काळ वांचतील आणि जर्मन सैन्याची विस्कट- लेली घडी पुनश्च बसविण्याला थोडीशी उसंत मिळेल. व्हिएन्ना पडेल काय ? रणक्षेत्रावरची सद्यःस्थिति अशी आहे कीं, दोस्त राष्ट्र जर्मनीला बहुतेक बाजूनें गराडा घालून अगदी त्याच्या उंबरठ्याला येऊन भिडली आहेत. उत्तरेकडची बाजूच जर्मनीला थोडीशी मोकळी आहे. दक्षिणेलाहि आल्प्स पर्वत जर्मनीला दरवाजाच्या अडसरासारखा उपयोगी पडणारा असल्यानें तिकडून शत्रु घरांत घुसण्याची धास्ती जर्मनीला तितकीशी वाटत नाही. परंतु पूर्व आणि पश्चिम या दोन्ही आघाड्या अगदी धोक्याच्या झाल्या आहेत. पूर्व-प्रशियाचा बहु- तेक भाग सपाट असल्याने तेथें प्रतिकाराच्या नैसर्गिक साधनांचा अभावच आहे. याकरितांच रशियाचा मुख्य रोख पूर्व-प्रशियांतून बर्लीनवर चालून जाण्याचा आहे. त्या भागांतल्या जर्मन सैन्याचा कडवा प्रतिकार लक्षांत न घेतला तरी त्या भागांतील कडक हिवाळा, दलदली व जंगले यांच्या योगानेंहि ला चढाईस पुष्क- ळच प्रतिबंध होईल. झेकोस्लोव्हाकियांतून जर्मनीवर चढाई करणें तितकेंसें सुलभ नाही. याकरितां रशियानें हंगेरीत लढाईला तोंड पाडून बुडापेस्टवर मारगिरी चालविली आहे. प्रत्यक्ष हंगेरी हा देश डोंगराळ नसला तरी, हंगेरीच्या भोंवतीं डोंगराळ मुलखाचें कडें आहे, त्यामुळे रशियाला हंगेरीतील चढाईच्या सैन्याचा