पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कडून दोस्तांना पाऊल ठेवूं देणार नाहीं, ही जर्मनीची वल्गना तर फोल ठरली आहेच, पण शेरबुर्ग गमाविल्याचे परिणाम जर्मनीवर इतके दूरगामी होणार आहेत की, जर्मनीला यापुढें चढाईचें धोरण स्वीकारणें अशक्य होईल. राष्ट्रसंघाच्या संरक्षण योजनेचा तळ चालू महायुद्धाच्या हालचालीपुरतेंच वरील वाक्य मर्यादित नाहीं. भावी युद्धांतहि जर्मनीच्या फ्रान्सवरील चढाईला पायबंद बसणार आहे. पहिल्या व चालू अशा दोन्ही महायुद्धांत जर्मनीनें पहिल्या धडाक्यासरशी फ्रान्सला लोळविलें आणि दोस्तांना फ्रेंचांना वेळेवर मदत पाठविणें दुस्तर झालें. यापुढे शेरबुर्गचा किल्ला हा दुसरा जिब्रॉल्टरचा किल्ला होईल. जिब्रॉल्टरमुळे भूमध्य समुद्र जसा ब्रिटि- शांना निर्वेधपणे वापरतां येतो व शत्रूचा तेथें प्रवेश होऊं शकत नाहीं, त्याच- प्रमाणे शेरबुर्गरूपी भावी जिब्रॉल्टरच्या आधारावर ब्रिटिश मुत्सद्दी फ्रेंचांना काय- मचें संरक्षणाचें आश्वासन देऊं शकतील. फ्रेंच लोक शेरबुर्गसारखें बंदर आपल्या हातून कायमचें जाऊं देतील व ब्रिटिश तें बळकावतील असा त्याचा अर्थ नव्हे. परंतु हे महायुद्ध समाप्त झाल्यानंतर पुनश्च जर्मनीनें डोके वर काढू नये यासाठीं राष्ट्रसंघामार्फत संरक्षणाच्या ज्या अनेक योजना आंखण्यांत येतील त्यांत रखवाली- च्या कामासाठी राष्ट्रसंघाचें कांहीं आरमार, कांहीं लष्कर आणि कांही विमानदल येथें कायमचें ठेवून द्यावें असें ठरेल. तसें ठरल्यास राष्ट्रसंघाच्या या सैनिकांना तळ देण्याला शेरबुर्गसारखे दुसरें सोयिस्कर स्थान मिळणार नाहीं. यास्तव स्वित्झर्लंडनें राष्ट्रसंघाच्या कचेरीची जशी सोय केली आहे तशी फ्रान्सलाहि राष्ट्र- संघाच्या या रखवालदारांची कांहीं सोय करावी लागेल आणि त्या सोयीच्या दृष्टीनें शेरबुर्गची इतकी मजबुती केली जाईल की, जिब्रॉल्टरला देखील त्याचा हेवा वाटू लागण्याचा संभव आहे. पराजयाला हिंवाळा आड [ नोव्हेंबर महिन्याच्या मध्याला आणि युरोपांतील हिवाळ्याच्या सुरुवा- तीला हा लेख लिहिला असून त्यांत महायुद्धांतील सर्व आघाड्यांवरील परि- स्थितीचा आढावा घेण्यांत आला आहे. या आढाव्यावरून असा निष्कर्ष काढ- ण्यांत आला आहे की, गहीराष्ट्रांचा चारी बाजूंनी कोंडमारा झाला असून त्यांची कुचंचणा दिवसेंदिवस वाढतच आहे. दोस्त राष्ट्रांतील मुत्सद्दयांना आतां जयाची ( केसरी, दि. १४ नोव्हेंबर १९४४ )