पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

युरोपांतलें नवें जिब्रॉल्टर ७१ जर्मनांचें चिटपाखरूं फिरकूं शकणार नाहीं, इतका त्याचा कडेकोट बंदोबस्त करण्यांत येईल. अशा रीतीनें लोहमार्गाइतकाच हा सागर-मार्ग सुगम झाला म्हणजे इंग्लंडांतील प्रचंड तोफा, रणगाडे व इतर अवजड रणसाहित्य हजारों सैनिकांसह फ्रेंच रणभूमीवर उतरविण्यांत येईल आणि तें पॅरिसची वाट चालूं लागेल. तत्पूर्वी शेरबुर्ग द्वीपकल्पांत शक्य असेल तेथें विमानांचे तळ बांध- ण्यांत येतील. एकदां हे तळ तयार झाले म्हणजे जर्मनीवर विमानहल्ले करण्याला इंग्लंडांतून न निघतां शेरबुर्ग द्वीपकल्पांतून निघतां येईल. जर्मनीच्या पूर्व-सरहद्दी- वर रशियानेंहि विमानतळ बांधून त्यांचा उपयोग करण्याची दोस्तांना मुभा दिली असल्यामुळे वैमानिक हल्लयाची मोठीच सोय झाली आहे. शेरबुर्गहून निघावें आणि जर्मन प्रदेशावर यथेच्छ घिरट्या घालून बॉम्ब टाकणें संपतांच रशियन विमान- तळावर उतरावें आणि तेथून पेट्रोलची व बॉम्बची नवी भरती करून घेऊन जर्म- नीवर आग ओकीत ओकीत परत शेरबुर्गला येऊन उतरावें. या सोयीमुळे एका फेरींत पूर्वीच्या दुप्पट विध्वंसनाचें कार्य होऊं शकेल. ग २६० मॅजिनो तटबंदीपर्यंत माघार ४३४० रोखानें चालू लागले शेरबुर्ग बंदरांत उतरणारे भावी रणगाडे पॅरीसच्या म्हणजे त्यांना अडविणें जर्मनांना जड जाईल. कारण इटालींत होता तसा डोंग- राळ मुलूख येथें वाटेंत नाहीं. या कारणामुळे जर्मनांना पॅरिस सोडून फ्रेंच मुलु- खाला रामराम ठोकावा लागेल. अशा रीतीनें जर्मनांना मॅजिनो तटबंदीपर्यंत माघार घ्यावी लागेल. अर्थातच पॅरिस शहर दोस्तांच्या हाती पडतांच जर्मनी आपण होऊन बेल्जम हॉलंडमधलें सैन्य मागें घेईल. दोस्तांच्या चढाईला तोंड देण्यांत आपल्या सैन्याची व्यर्थ हानि करून घेण्यापेक्षां आपण होऊनच आपलें रणक्षेत्र संकुचित करण्यांत जर्मनीचा दुसराहि एक फायदा होऊं शकेल. रशियनांची नवी मुसंडी सुरू झाली आहे व तिला थोपविण्याला जर्मनीला सैनिक आणि रणसामुग्री दोहोंचीहि उणीव भासत आहे, यास्तव जर्मनी पश्चिमेकडील आपली आघाडी खडून घेऊन मॅजिनो लाइनवर बचावाची लढाई देत राहील आणि त्या बाजूचें जादा सैन्य रशियन आघाडीवर आणून रशियाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करील. कारण जर्मनीला जसा रण- साहित्याचा तुटवडा भासत आहे तसाच सैनिकांचाहि तुटवडा भासूं लागला आहे. जर्मनी जेथें एक नवा सैनिक उभा करूं शकतो तेथें दोस्त ६ सैनिक उभे करूं शकतात. एवंच, शेरबुर्ग हातचें गेल्यानें जर्मनीला भापले युद्धाचे सगळेच जुने बेत बदलून नव्या परिस्थितीला तोंड द्यावें लागेल. अशा परिस्थितीत बचावाचें धोरण तरी किती काळ टिकवितां येईल हा प्रश्नच आहे. युरोपच्या रणभूमीवर पश्चिमे