पान:श्री ज स करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध खंड १ ला.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. ज. स. करंदीकर यांचे निवडक लेख व निबंध कनांनाहि हें स्थळ घेण्यासाठी भारीच किंमत द्यावी लागली. दि. २० जूनपर्यंतच्या पंधरा दिवसांतच त्यांचे सुमारे ३ हजार सैनिक ठार, १३ हजार जखमी, ८ हजार बेपत्ता झाले होते. खरा निकराचा संग्राम दि. २० ते २६ पर्यंत झाला. या सहा दिवसांतील हानि लक्षांत घेतल्यास जर्मन सैन्याच्या हानीपेक्षां ती अधिकच भरेल... दिल्ली दरवाजाची किट्टी एवढे भारी मोल द्यावें लागले तरी तें देऊन शेरबुर्ग हस्तगत केलेच पाहिजे असेंच या स्थळाचें महत्त्व आहे. प्रचंड जहाजांतून सैनिक आणि अवजड रणगाडे किनाऱ्यावर उतरविण्याला शेरबुर्गसारखें दुसरें सोयिस्कर बंदर नाहीं. इंग्लंडच्या साउथॅम्पटन बंदरापासून ते अवघें ८३ मैल अंतरावर असल्यामुळे इंग्लंडला रण- साहित्य उतरविण्याला तें सोयिस्कर आहे. क्वीन मेरीसारखें प्रचंड जहाज ओहोटी-. च्या वेळीं देखील धक्क्याला लागूं शकेल अशी त्याची नैसर्गिक रचना आहे, शिवाय त्या बंदराच्या अडीच मैल घेराच्या टापूंत नांगरलेल्या जहाजांना वादळाचा उपसर्ग पोंचत नाहीं. हें या बंदराचें वैशिष्टय होय. असें बंदर हातीं येणें म्हणजे युरोप खंडाच्या तटबंदीतील दिल्ली दरवाजाची किल्लीच हाती येण्यासारखें असल्यानें दोस्त सेनापतींनी शेरबुर्ग बंदराचाच रोख धरून या स्वारीकरितां पाऊल पुढे टाकलें. अमेरिकन सैन्यानें अचाट पराक्रम करून एवढे महत्त्वाचें ठाणें काबीज केलेले पाहून ब्रिटिश सैनिकांना त्यांच्या यशाचा हेवा वाटू लागला आहे. याचकरितां ‘तिकडे नॉर्मडीहून माँटगॉमेरीनें चढाई करून रोमेलचें रणगाड्यांचें पथक अडवून धरलें म्हणून अमेरिकनांना शेरबुर्गची कोंडी करतां आली व त्याचा पाडाव इतक्या लवकर झाला', असा खुलासा करण्यांत येत आहे. पण त्यांत कांहीं हंशील नाहीं. स्वारीची योजना ठरवितांना शेरबुर्गची अवघड कामगिरी अमेरिकनांच्या वांट्यास देण्यांत आली व ती त्यांनी पत्करिली यांतच त्यांचा आत्मविश्वास प्रकट झाला आणि तो यथार्थ होता हे त्यांनी शेरवुर्ग घेऊन सिद्ध करून दाखविलें यांतः शंका नाहीं. महायुद्धाला मिळणारी कलाटणी दोस्तांनीं शेरबुर्ग जिंकलें तेव्हा फ्रेन्च रणभूमीवर ते शेर झाले हैं उघडं आहे. आतां वा विजयाचे भावी परिणाम काय होणार आणि महायुद्धाला कशी कलाटणी मिळणार ते पाहिले पाहिजे. दोस्तांनी तिसरी आघाडी सुरू करून जर्म-- नीची अटलांटिक तटबंदी फोडली, आतां याचा कसकसा फायदा घेतां येईल तें पाहूं. शेरबुर्ग बंदराचा जर्मनांनीं जातां जातां विध्वंस केला असला, तरी अमेरिकन स्थापत्यविशारदांना तें बंदर कामचलाऊ स्थितीत आणण्याला मोठासा कालावधि लागेल असें नाहीं. बंदरांतील वाहतूक निर्वेध झाली की, इंग्लंडांतील साऊथम्पन बंदरापासून शेरबुर्गपर्यंतचा ८३ मैलांचा सागर-मार्ग रोखून धरून त्यांतः