पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशा गोष्टी घडतात. सिद्धी सारखा हा प्रकार आहे. तो परमार्थाला घातक आहे "These are pitfalls "

 ३)१९४१ मध्ये एका साधकाच्या पत्नी क्षयाने आजारी होत्या. त्या साधकाजवळ श्री बाबासाहेब लिमये व शंकरराव मोकाशी भेटावयास गेले व तेथे वसले. इतक्यात तेथे बाबासाहेबाना गुरुदेवांची मुर्ती दिसू लागली. ती जवळ जवळ अर्धातास होती. लगेच वावा- साहेवानी कापूर लावला आणि नमस्कार केला. त्यावेळी गुरुदेव अलाहावादला होते. पुढे वावासाहेबानी ही गोष्ट गुरुदेवाना सांगितली तेव्हां त्यानी आकाशापुढे पाहून नमस्कार केला आणि म्हणाले यांत माझा कांही संबंध नाही. तुमची परमेश्वरावर निष्ठा आहे त्या पुण्याचे हे फळ आहे. आणि पुढे म्हणाले, समर्थ रामदासानी म्हटले आहे, “संत चमत्कार करीत नाहीत ते देवाच्या कृपेने होतात. कारण " ते पुण्यमार्गे गेले म्हणोनिया".

 ४) डेअरीचा धंदा करणाऱ्या एका साधकाला १५०० रुपये कर्जं झाले होते. एकदा ते निवाळ माश्रमांत वरील कारणाने चिताग्रस्त वसले होते. तेव्हां श्री गुरुदेवानी चिंतेचे कारण विचारले आणि म्हणाले "चिंता करु नको जा". त्यानंतर त्यांचा धंदा वाढला, कर्ज फिटले. हा वाणीचा प्रताप.

 गुरुदेवानी आशिर्वाद देवून व कृपा दृष्टीने अनेक सावकांची सकटे दूर केली आहेत. " कृपादृष्टी " म्हणजे काय हे कित्येक साधकांच्या अनुभवाला आले आहे. कृपादृष्टी हा कल्पनाविलास नाही वा अधविश्वास नाही. याचा अनुभव डॉ करमकर सारख्या नामाकित डॉक्टरानीही आपले वडिलांचे बाबतीत घेतला आहे.

 चमत्कार करतो तोच साधू असे मात्र समजू नये. पुण्यवंताचा आशिर्वाद मिळालेवर किंवा कांही साधना करूनही चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. पण चमत्काराचा उपयोग जेव्हां स्वतःचा मोठेपणा बाढविण्यास केला जातो तेव्हा त्याला बाजारी स्वरुप येते. खरे संत

4