पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच्या मागे लागत नाहीत. पण निष्ठावंत भक्ताच्या संकटाविषयी कळवळा येवून संत जे सहज बोलतात त्यामुळे भक्तांचे हित होते. पण अशावेळी त्या संताना, आपण बोलतो व घडते ही भावनाही तेव्हां असत नाही. प्रत्येक गोष्ट ईश्वरी इच्छंने घडते अशीच त्यांची मनोमन खात्री असते.

गुरुदेवांचे उद्बोधक विचार


 १) मनुष्यास कांहीतरी ध्येय असावे मग कोणाचे ध्येय विद्या संपादन करणे असेल, कोणाचे द्रव्य प्राप्ती असेल, कोणाचे उद्योग अगर नोकरी असेल - अशी अनेक ध्यये असू शकतात. पण ती नाशवंत असतात. खरे ध्येय एकच 'भगवंताची प्राप्ती". त्याची प्राप्ती करुन घेण्यास अनेक अडचणी येतील, त्याची कदर करू नये. उदाहरणार्थ, तुकाराम यांचा प्रपंच शून्य होता. घरात दारिद्रय. समर्थ ब्रम्हचारी. एकनाथ प्रपंच- परमार्थ सुस्थिती तरी त्या सर्वांचे ध्येय एकच, ते म्हणजे परमेश्वर प्राप्ती हेच होते. त्यावर त्यांचा भर होता ".

 २) स्वरुपी राहाणे हा स्वधर्म - नामस्मरण करणे हा खरा धर्म, इतर धार्मिक गोष्टी कांहीही कामाच्या नाहीत. " नाम फुकाचे फुकाचे " असा अभंग अ हे; पण नाम फुकाचे नाही.

 ३ ) प्रयत्न प्रारब्ध दोन्ही सिद्धांत खोटे, देव कर्ता हेच खरे. गुरुदेव एकदा म्हणाले, प्रारब्धही कांही करु शकत नाही, व मनुष्याचा प्रयत्नही कांही करु शकत नाही. सर्व कर्तृत्व ईश्वराकडे आहे. त्याच्या इच्छेशिवाय कांहीही हालत नाही. ईश्वराच्या इच्छेने जे घडते, त्याच दिशेने योगायोगाने आपला प्रयत्न झाला, तर प्रयत्नाला यश आले असे आपण म्हणतो नाहीतर प्रारब्धावर ती घटना टाकतो. हे दोन्हीही भ्रमच आहेत. ईश्वरच सर्व कार्य करतो. या सिद्धांतावरूनच, मनुष्याचे एकमेव कर्तव्य म्हणजे स्वतःची अशी वेगळी इच्छा न ठेवता, ती देवाच्या ईच्छेशी एकरूप करावी, हेच उरते. त्यानें निमित्तमात्र व्हावें.

5