पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होती. आणि त्याप्रमाणे आचरण करण्यावर त्यांचा भर होता. म्हणून एका ठिकाणी माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् म्हणाले की " डॉ. रानडे हे तत्त्वज्ञान जगतात आणि आम्ही केवळ अभ्यास करतो”.

ऋद्धीसिद्धी : मानवी जीवनांत आचरणालाच महत्व फार आहे. केवळ सत्य वचन, सदाचरण, आणि ईश्वरचिंतन एवढ्यानें सुद्धा मनुष्याला ऋद्धीसिद्धी प्राप्त होतात. सिद्धी मिळाल्या की साधकाला अहंकार होतो आणि त्याच्या हातून चुका घडू लागतात आणि पुन्हा तो खाली येतो. गुरुदेवाना ऋद्धीसिद्धी प्राप्त झाल्या होत्या; पण त्यानी त्यांच्याकडे कटाक्षाने पाठ फिरविली परंतु त्यांच्याकडून कांही चमत्कार सहज रीतीने घडलेले आहेत. शिवाय त्यांच्या शद्वाने कित्येक जण संकटमुक्त आणि चिंतामुक्त झाले आहेत, नाही असे नाही. संत स्वत चमत्कार करीत नाहीत. ईश्वर त्यांच्यासाठी ते घडवून आणतो. असे कांही चमत्कार त्यांच्या शिष्यांनी अनेक पुस्तकांत नमूद केले आहेत. १ ) निर्वात स्थळी नेमास बसता यावे म्हणून श्री गुरुदेवानीं निबाळास आपल्या घराजवळच दोन खड्डे खणले होते. एक स्वतः नेमास बसण्यासाठी व दुसरा इतर लोकासाठी. तेथे ते नेमाला वसत. तो खड्डा सुमारे दीड पुरुष होता. त्यात एकदा ते धोतराची घडी घालून त्यावर नेमाला वसले. वरच्या बाजूस गडी बसला होता. दीड तास नेम करुन ते उठून घराकडे गेले. नंतर गड्याने खड्डयातील धोतराची घडी उचलली तेव्हां तिच्याखाली सर्प बसलेला होता. २) श्रीमंत बाळासाहेब औंधकर यांच्या वडिलांच्या पुण्य- तिथीच्या उत्सवासाठी श्री गुरुदेव औंधास गेले. तेथे पोहोंचताच, 'पाहुणे कोण आले आहेत' हा प्रश्न त्यांनी विचारला. ते एक अमेरिकन मिशनरी होते. त्यांना भेटण्यास ते गेले. तेथून परत आल्यावर ते मिशनरी येणार ही पूर्व सूचना आपणास मिळाली होती, असे त्यानी सांगितले. याबाबत ते म्हणाले की "नामस्मरण पुष्कळ झाले म्हणजे 3