पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटचाल निश्चित अशी ठरलेली होती. म्हणूनच त्यानी लोकमान्य टिळकासारख्या महान् ग्रहस्थानी राजकारणांत येण्याविषयी आग्रह करु- नही ते तिकडे गेले नाहीत. आणि याच कारणास्तव डे. ए. सोसायटीत कांही काळ नोकरी करुन त्यांनी राजीनामाही देवून टाकला. अर्थिक अडचणी सोसल्या. शेवटी अलाहाबाद युनिव्हर्सिटीने त्याना मानाने बोलावून घेवून शेवटीपर्यंत त्याना ठेवून घेतले. एवढेच नव्हे, तर त्याना तेथील व्हाईस चान्सलरही केले. " निस्पृहस्य तृणम् जगत् अशो त्यांची वृत्ती जन्मभर टिकून राहिली. मग दारिद्रय येवो, उपेक्षा होवो, अगर मान मरातव मिळो. त्यांच्या स्वभावावर कांहीही परिणाम झाला नाही. संत ही सार्थ पदवी त्याना लागू आहे. कारण लौकी क दृष्ट्या सामान्य माणसे ज्याला सुख म्हणतात ते प्रापंचिक असो अगर शारिरीक सूख असो, त्याना मिळालेच नाही, त्याची त्यानी अपेक्षाच केली नाही. हे त्यांचे चरित्र वाचून समजून येते. संताची ती कसोटीच आहे. तो परीक्षा या जन्मात त्याना पास व्हावीच लागते. ते लोखंडांचे चणे पचवावे लागतात, तेव्हांच संत ही पदवी मिळते. गुरुदेवांची दोन लग्ने झालो, एक मुलगा अल्पायु जन्माला आला. प्रकृतीच्या कटकटी- मुळे खाणेपिणेही त्याना पोटभर करता येत नव्हते. कित्येक दिवस ते केवळ चहावरच आपली भूक भागवीत. अशी सर्व बाजूनी त्यानी परिक्षा दिली आणि ते पास झाले.

गुरुदेवांचे वाङमय :


 पुर्वीच्या अनेक संताप्रमाणे गुरुदेवानी उपासना ग्रंथ किंवा काव्ये लिहिली नाहीत. त्यांचे सर्व वाङमय बुद्धिवादी आहे. अधश्रद्धा, कर्मकांड या गोष्टी त्यांच्या संप्रदायात नाहीतच. नेम,आरती आणि दासबोधवाचन हीच महत्वाची साधना त्यानी सर्वाना सांगितली. पूजाअर्चा, नैवेद्य, अभिषेक अशा सेवाना इथे फारसे महत्व नाही. हे सर्व कर्मकांडच. त्यानी संत तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर, एकनाथ, कबीर यांच्या ग्रंथावर भाष्ये लिहिलीच. शिवाय गोता, वेद यावरही लिहिले. ते तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते. त्यामुळे त्यांची वृत्ती शोधक होती; सत्यासत्य पडताळून पाहाण्याची

2