पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ही संस्था स्थापन करतेवेळी श्री गुरुदेवानी उद्गार काढले की, या संस्थेमार्फत आपले तत्वज्ञान जगभर प्रसारित होईल. सद्गुरूंची वाणी खरी ठरणारच.

असे होते गुरुदेव


 श्री गुरुदेवाना जन्मभर दुखण्याने सोडले नाही तरी त्यांचे साधन चोवीस तास चाले. आपल्या प्रकृतीची अगर वेळप्रसंगी निर्माण झालेल्या अर्थिक अगर इतर अडचणींची यत्किंचितही वाच्यता त्यानी केली नाही. झोप कमी वाचन, लेखन, संभाषण सतत चालू असे. त्यांना आयुष्यात एकच दुःख जाणवले ते म्हणजे आपले सद्गुरुंच्या निर्याणाचे.

 श्री महाराजांच्या फोटोपुढील अंगारा लावून घेणे व तेथे कापूर, उदवत्ती लावणे हे त्यांचे आवडीचे काम. घरातून बाहेर जाताना किंवा परगावाहून आल्यावरोवर प्रथम हे काम ते करीत.

 शेवटी शेवटी ते चहावरच राहात. थोडाथोडा दिवसातून चारपाच वेळा चहा घेत.

 गुरुदेव उपनिषत्कालीन सत्पुरुष होते. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजाप्रमाणे थोर संत आणि साक्षात्कारी पुरुष होते. पारमार्थिक अनुभवाच्या अगदी उच्च शिखरावर पोहोचून तो परमार्थ मुक्त हस्ताने दान करीत होते.

"आपण तरेल नव्हे ते नवल ।
कुळे उद्धरील सर्वांची तो " ||

आपण तरून इतरानीही तरावे असे त्याना वाटे.


 याप्रमाणे आपले सारे जीवन भक्तीला, परमार्थाला वाहून त्यातच कृतकृत्य होऊन गुरुदेवानी जगावा शांतपणे निरोप घेतला ( ६ जून १९५७ ). जन्माला आला तो जाणारच. संत हे देहरुपाने

19