Jump to content

पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री नागाप्पा आण्णा याना गुरुदेव रानडे यांचेकडे बोट दाखवून म्हणाले, " हा राम तुमच्या आजोबांची किर्ती साना समुद्रापलीकडे नेईल बरं का ?"

 ही सद्गुरुची वाणी पुढे अक्षरश: खरी झाली. सन १९२६ साली A Constructive Survey of Upanishadi Philosophy हा उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाचे समालोचन करणारा, गुरुदेवानी लिहिलेला ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि या ग्रंथामुले आणि इतर अशाच ग्रंथामुळे श्री गुरुदेव रानडे यांचे नांव एक थोर तत्त्वज्ञानवेत्ता म्हणून जगप्रसिद्ध झाले. त्याना जागतिक किर्ती मिळाली. एवढेच नव्हे, परमार्थीयाना मार्गदर्शन करणारा, साक्षात्काराचा महाभाष्यकार आणि या विसाव्या शतकातील एक महान् थोर साक्षात्कारी संत म्हणून त्यांची कीर्ती जगभर पसरली आहे.


संस्था

BR>

 धर्म व तत्त्वज्ञान या विषयांचा सांगोपांग अभ्यास करणेकरता तारीख १-८-१९२४ रोजी श्री गुरुदेवांनी "अकॅडेमी ऑफ फिलॉसॉफी अँड रिलिजन " म्हणून एक संस्था स्थापन केली. ते या संस्थेचे डायरेक्टर झाले आणि प्रो. पी. के गोडे व प्रो. एन्. जी. दामले हे सेक्रेटरी होते. या संस्थेमार्फत "भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास" म्हणून काही ग्रंथ प्रसिद्ध करणेचा विचार होता. A Constructive Survey of Upanishadic Philosophy, हा ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला. आणखी काही ग्रंथ प्रसिद्ध झाले आणि संस्था बंद झाली.

 १९५२ सालामध्ये, याच नावाची संस्था कंपेरेटिव्ह हा शब्द जास्त घालून म्हणजे अकॅडेमी ऑफ कंपेरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन असे नामाभिधान ठेवून, बेळगांव एथें श्री गुरुदेवानी स्थापन केली. विश्वस्तनिधी म्हणून ही संस्था नोंद केली. ही संस्था कार्यरत असून व्याख्यानें, परिसंवाद घडवून आणले जातात. या संस्थेने काही ग्रंथही प्रसिद्ध केले आहेत:

18