Jump to content

पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जातात पण अमरुपाने अपर असतात. भारत हो संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वरानी " ईश्वरनिष्ठांची मांदियाळी" जगावर निर्माण होऊ दे; आणि जगावर ज्ञानाचा प्रकाश सतन पाडत राहू दे, असे विश्वात्मक देवाजवळ मागणे मागितले. ते मागणे विश्वात्मदेवाने " हा होईल दान पसावो " म्हणून आशिर्वाद दिला. तो आशिर्वाद खरा होणारच. त्याला अनुसरुन महाराष्ट्राला एकनाथ, रामदास, तुकाराम असे एक नव्हे, दोन नव्हे, शेकडो संतांचे वरदान लाभले आहे. त्याचप्रमाणे निंबरगी संप्रदायातील हे तीन श्रेष्ठ संत म्हणजे श्री भाऊसाहेव महाराज, श्री अंबूराव महाराज आणि श्री गुरुदेव रानडे.

 "महाजनो येन गतस्य पंथ: " महाजन म्हणजेच संत. ते ज्या मार्गाने गेले व त्यानी जो मार्ग दाखविला त्या मार्गाने जाण्यांतच जीवनाचे सार्थक आहे.

ॐ शांतिः
ॐ शांतिः

ॐ शांतिः


संदर्भ ग्रंथ
 १)श्री गुरुदेव रानडे : प्रा भालचंद्र मोडक व सौ वसुधा मोडक
 २)प्रा. रा द. रानडे - चरित्र आणि तत्वज्ञान : शं. गो. तुळपुळे
 3)Silver Jubilee Souvenir, Vol 1-Ed. K D. Sangoram and M. S Deshpande
 4)Pathway to God- Quarterly journal
 ५)पुण्यस्मृती - कृ. दा. सगोराम

20