पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

For he on honeydew hath fed
and drunk the milk of paradise

 ( मराठी भथितार्थ : डॉ. रानडे यांच्या कृश देहामधे परमात्मा बसत होता. ते एक थोर रचनाकार, शिक्षक आणि बुद्धिमंत होते मोठ तत्वज्ञानी, साक्षात्कारी होते. कित्येक वर्षे चहाशिवाय दुसरे अन्न ते घेत नसत. अमृतरस पिणान्यास अन्नाची जरुरी काय ? )

 डॉ. राजेंद्र प्रसाद, राष्ट्रपती (१९५४) म्हणतात.. प्रो रानडे यांचा निरनिराळ्या भारतीय भाषांतील "संतवानी"चा अभ्यास अनेक वर्षांचा असून पूर्वीपासून चालत आलेले हे तत्त्वज्ञान त्यांच्या ठिकाणी मूर्तिमंत स्वरूपात वास करीत आहे.

 १९५६ साली श्री गुरुदेवांचा अमृत मोहोत्सव साजरा झाला. त्यानिमित्त त्यांच्या तैल चित्राचे अनावरण कै. गंगाधरराव देशपांडे यांचे हस्ते झाले, तेव्हा ते म्हणाले "आज माझ्या वयाला ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या पन्नास वर्षांतील राजकारणी आयुष्यातील अनेक घडामोडी मो अनुभवल्या मी स्वतः अनेक चळवळी केल्या. अनेकदा तुरुंगात गेलो. आता देश स्वतंत्र झाल्याने माझें राजकीय ध्येय सफल झाले आहे. पण मला आध्यात्मिक समाधान नव्हते. ते मला रामभाऊंच्या एका भेटीत आणि जो थोडा सहवास लाभला त्यांत मिळाले. तीन वर्षापूर्वी रामभाऊंच्या अखेरच्या टप्यात माझा रामभाऊशी संबंध आला हे मी माझें भाग्य समजतो. त्यांच्यामुळे मला सात्विक समाधान मिळाले. आता मला समाधानाने मृत्यू येईल.

श्रीमहाराजांची भविष्यवाणी


 सन १९०७ साली श्री गुरुदेव रामभाऊ रानडे हिचगेरीस आपल्या सद्गुरूंच्या सहवासात होते. त्यावेळी प. पू. श्री निंबरगी महाराजांचे नातू श्री नागापा आण्णा हे सद्गुरु भाऊसाहेब महाराजांना भेटावयास आले होते. बोलण्याच्या ओघात श्री भाऊसाहेब महाराज

17