पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटले तरी त्यांचा आध्यात्मिक आणि बौद्धिक उत्साहच नव्हे तर शारिरीक उत्साह सुद्धा मोठा होता. त्यांचे भरभर चालणे जणू त्यांच्या आनंदी व्यक्तित्वाचे निदर्शक होते. भपकेवाजपणा अथवा दिखाऊपणा तेथे नावालाही नव्हता. भोवतालच्या साधकांना ते देवाप्रमाणे वाटत असले तरी त्यांची विनोदी वृत्ती कायम होती. ते बोलण्यात स्पष्ट होते........ ते अत्यंत नम्रपणे वागत असले तरी निवाळला येणान्या व्यक्तीला गुरू कोण हे सहज ओळखता येत असे. त्यांची अध्यात्मिकता त्यांच्या प्रत्येक दृष्टिक्षेपातून, शद्वातून व कृतीतून व्यक्त होत असे. ते स्वभावताच संत असल्यामुळे आपण सत आहोत हे भासविण्याची गरज त्यांना नव्हती.

 मला श्री रानडे यांच्या आध्यात्मिक आणि बौद्धिक साधनेबद्दल कौतुक वाटतेच. पण मला स्पष्ट आठवते ते त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्व. मला व इतर अनेकानाही ते असे एक मित्र होते की ज्याला कधीही विसरणे शक्य नाही त्यांच्या शिष्याना तर. ते फारच थोर वाटत. ते भारतातील एक श्रेष्ठ पुरुष होते. भारतात काय किंवा अन्य देशात काय विविध संशोधनांत गुंतलेले अनेक विद्वान आहेत. सत्याचा शोध घेणारी सखोल दृष्टी असलेले तत्त्वज्ञ आहेत. दिव्य अनुभव असलेले अनेक श्रेष्ठ अनुभावी आहेत. आपल्या शिष्याना स्फूर्ती देणारे अनेक श्रेष्ठ शिक्षक आहेत. ज्यांचे व्यक्तिमत्व तेजस्वी आहे असे महात्मे आहेत. परंतु हे सर्व गुण एकसमयावच्छेदेकरून ज्यांच्यांत आहेत असा माणूस विरळा. श्री रानडे अशा प्रकारचे होते. मनुष्य- स्वभाव किती सुरेख असू शकतो याचं एक दुर्मिळ उदाहरण श्री रानडे होत.”


 डॉ. व्ही. के. गोकाक हे गुरुदेवांचेबद्दल म्हणतात "The frail body of Dr. Ranade houses a great soul. He was great builder, teacher and scholar and a serene philosopher and mystic. For several years he hardly lived on any other nourishment but tea. But he needed no other food.

16