पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यावर श्री गुरुदेवाना सही करणेस त्यांनी सांगितले. गुरुदेवानी वकील- पत्र वाचलेवरोवर उद्गार काढले की, "मी कोणाचा प्रतिवादी नाही, 'आपोनंट' नाही. मी कोणाचा द्रोह करीत नाहीं. सर्व लोक मला सारखे आहेत ". वकीलपत्रावर त्यानीं सही केली नाहीं. श्री बाबा- साहेवानीं मामलेदारन। हकीगत समजून सांगितली; आणि जमीनीची जी किंमत त्यानी मंजूर केली तेवढी घेवून परत आले.

 १९२४ साली डे ए. सोसायटीचा राजीनामा देवून, गुरूदेव निवाळ येथे राहणेस गेले. १९२६ साली त्यांचा ग्रंथ Constructive Survey of upanishadic Philosophy प्रसिद्ध झाला. याचवेळी ते पैशाचे अडचणीत आले, म्हणून श्री वाळासाहेव देशपांडे या आपले मित्राना त्यानी पत्र लिहून भेटीस बोलाविले. श्री बाळासाहेब हे त्या वेळी वागलकोट एथे मामलेदार होते. घरचे श्रीमंत व मलिकवाड गावचे इनामदार पत्र पोचलेवरोवर दुसरे दिवशी आपली व्यूक गाडी घेवून ते निवाळास सकाळीच पोचले. गुरुदेवांचे कडून हकीगत समजले- बरोबर त्यानी खिशातून पाचशे रुपयांचा नोटा काढून गुरुदेवांचेपुढे ठेवून, उद्या वागलकोटला परत गेलेवरोवर आणखी पाचशे रुपये लावून देतो असे सांगितले श्री गुरुदेवांनी ती रक्कम घेणेचें नाकारले. माझा हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या दोनशे प्रति खपवून मला तीन हजार रुपये आणून द्या असे श्री गुरुदेवानीं त्याना सांगितले. श्री बाळासाहेवानी त्याप्रमाणे करणेचे कबूल करून ग्रंथ खपवून रक्कम गुरुदेवांचेकडे दिली.

 श्री जॉर्जं वर्च नावाचे एक अमेरिकन प्राध्यापक श्री गुरुदेवांचे भेटीकरता निवाळ एथे गेले होते. तेथे ते काही दिवस राहून परत गेले. श्री गुरुदेवांचे निर्यागानंतर, त्यांनी आपले लेखांत श्री गुरुदेवांचे वर्णन खालील प्रमाणे केले आहे.

 "प्रो. रानडे जसे असतील असे मला वाटले होते, त्याच्या सर्वस्वी विरुद्ध ते आहेत असे दिसून आले. त्यांची प्रकृती नाजूक व किडकिडीत होती. वाग्याचे झुळुकीनेही ते उडून जातील की काय असे

15