पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अशाप्रकारे, नाद, स्पर्श, गंध वगैरेतद्दल अनुभव त्यांना वेत असत. 'जेथे जाई तेथे तू माझा सांगाती । रखुमाईचे पती सोयरीया ।' हा अनुभवही त्यांना पुष्कळदा आला होता. अमृतरसही मिळत होता.

प्रसन्न व्यक्तिमत्व


 भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायात दैवी संपत्तीचे गूण कोणते त्याचे वर्णन केलें आहे :

अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः |
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ।। १
अहिंसा सत्यनक्रोधस्त्याग: शांतिरपैशुनम् |
दया भूतेष्वलोलुप्तं मार्दवं म्हीरचापलम् || २
तेज: क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवंति संपदं दैवीमभिजातस्य भारत ॥ ३.

हे सर्व दैवी गुण एकाच ठिकाणी पहावयाचे झालेस, श्री गुरुदेव रानडे यांचेकडे बोट दाखवावे लागेल. या दैवी गुणांचे ते माहेरघरच होते. १९४७ सालों अलाहावाद युनिव्हर्सिटीचे नोकरीतून निवृत्त झालेवेळी प्रॉव्हिडंट फंड वगैरे मिळून युनिव्हसिटीनें श्री गुरुदेवाना सत्तर हजार रुपये अजमासे देणेंचे होते. दोन वर्षे होवून गेली, तरी पैसे मिळाले नाहींत. श्री गुरुदेव पैशाचे अडचणीत असताना हा विषय सहज बोल- ण्यामध्ये निघाला त्यावेळी तेथें बॅरिस्टर अंकलीकरही होते. “पैसे देत नाहीत, तर कायदेशीर नोटीस देवून वसूल करुया” असें ते म्हणाले श्री गुरुदेवानीं उत्तर दिले. “छे, छे, सध्या युनिव्हर्सिटीच पैशाचे अडचणींत आहे आणि अशा वेळीं नोटीस देवून युनिव्हर्सिटीचे मन दुखविणें, बरे नव्हे ". किती थोर अहिंसा ? मनाचा केवढा मोठेपणा ?

 रामदुर्ग एथे श्री गुरुदेवांची जमीन होती; कुळाकडे होती. मुंबई राज्यात 'कूळ' कायदा १९४७ साली लागू झालेवर, रामदुर्गचे मामले- दारनीं कायद्याप्रमाणे श्री गुरुदेवाना नोटीस दिली. गुरुदेवांची अशी कामें कै. वावासाहेव संगोराम पहात असत. वकीलपत्र तयार करून,

14