पान:श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मग जे जे कां निमिख | देखेल माझे सुख |
तेतुले अरोचक | विषयीं घेईल ॥

असो. साधकाचे जीवनांत नेम हा मुख्य इतर गोष्टी दुय्यम हे ओळखून वागावे.

साक्षात्कार- अनुभव :-


 इ स. १९१९ सालीं श्री गुरुदेवांची प्रकृति अतिशय विघडली. मातोश्री व पत्नी वारल्यामुळे, शुश्रुषा करणेस कोणीही नव्हते. म्हणून परमेश्वरावर सर्व भार टाकून, त्यांनी आपला नेम वाढविला. आध्या- त्मिक अनुभव वाढले. त्या अनुभवावद्दल, त्यानींच लिहिलेला अभंग काय सांगतो ते पहा :

अनंतरूपी आत्मा बिवविला डोळा । होतसे सोहळा आनंदाचा ||
शेषाचे वेटाळें प्रकाश चांदण्याचा | दिसतसे साचा दृष्टीपुढे ||
मोतियाचे जाळे शुद्धवत चुरा । शोभे जैसा हिरा चकचकीत ||
चक्रामध्ये चक्र एक नीलवर्णं गुरुकृपे जाण दिसतसे ॥

 त्याचवर्षी श्री गुरुदेव आणि काका कारखानीस हे टांग्यातून आळंदीला चालले होते. टांग्यातून जाताना श्री गुरुदेवाना श्रीकृष्णाचें दर्शन सतत घडत होते. ज्ञानेश्वरांचा एक अभंग आहे :

तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाशे | कमलनयन हास्यवदन भासे ||
कृष्णा हाल कारे, बोल कारे । घड़िये, घड़िये, घडिये गुज
बोल कारे ||
उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो । वापरखुमादेवीवरू
विठ्ठल नाही ||

आळंदीला पोचेपर्यंत हा अनुभव त्याना येत होता. नंतर त्यांनी काका खारखानीस यांना यावावत सांगितले. श्री गुरुदेवांना हा अभंग त्यानंतर अत्यंत आवडू लागला.

13