पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

121 (५८) ३ तो तिसराग्रह उत्तमाधिकारी किंवा मध्यमाधिकारी असावा. या तीन लक्षणांनी दुत्थोत्थदिवीर योग होतो. या योगाचें फळ दुसऱ्याच्या साह्याने कार्य सिद्धि करणारे आहे. उदाहरण. म. गु. श. रा. १ २ ९ अं. ८१९ १२ २४० ९० अस्त वक्र या उदाहरणांत लग्नेश मंगळ याचा अस्त आहे. आणि कार्येश गुरु हा वक्रो आहे. म० हे दोघेही निवळी आहेत. परंतु यांतील मंगळाचा स्वगृहीच्या ह्म. उत्तमाधिकारी शनीशी इत्थशाल योग आहे झणून हा दुत्थोत्थदिबीर योग झाला. दुत्थोत्थदिबीर योगाचे तात्पर्य, दोनीग्रह निर्बळी असले तरी त्यांतील ग्रहाचा बलिष्ठ ग्रहाशी इत्थशाल योग असतो. १४ वा तंबीर योग. ता. नी. बलीराश्यंतगोऽन्यक्षगामी दीप्तांशकैर्महः ॥ दत्तेऽन्यस्मै कार्यकरस्तंबीरोलमकार्यपोः ॥ ३५॥ अर्थ-१ लग्नेश आणि कार्येश यांचा इत्थशाल योग नसावा. २ त्या दोघांतीक एकग्रह ३० व्या अंशी असून उत्तमाधिकारी किंवा मध्यमाधिकारी असावा. ३ या ३० व्या अंशी वगैरोस्थित ग्रहाच्या पुढच्या राशीस असलेला ग्रह तो आपल्या दीप्तांशाच्या आत असावा.