पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५५) उदाहरण. म. शु. RO अं. १५ १० वक्र ११० वक्र या उदाहरणांत तूळलग्र आहे. लग्नेश शुक्र आणि कार्येश मंगळ यांचा इत्थशाल योग आहे. लग्नेश (शुक्र) लग्नापासून ३ स्थानी आणि कार्येश (मंगळ ) हा लग्नापासून १ या स्थानी असून वक्रा आहे ह्मणून हा २ ज्या प्रकारचा रद्द योग झाला. प्रकार ३ रा. १ लग्नेश व कार्येश यांचा इत्थशाल योग असावा २ कार्यश दुर्बली म० वक्र, अस्त, बाल्य, वार्द्धक्य, स्वनीचस्थान व स्वशत्रस्थान यांतील कोणत्याही लक्षणाने युक्त असावा. ३ तो कार्येश शीघ्रगतिग्रह असून लग्नापासून ३।६।९ किंवा १२ या स्थानी असावा. ४ लग्नेश लग्नापासून ११४१७ किंवा १० या स्थानी असावा. ही चार लक्षणे असतां रद्द योग होतो. या योगाचें फळ आरंभी कार्यनाश करणार असून शेवटी कार्य सिद्ध करणारे आहे.