पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाऽशुभं स्मृतं ॥ गैरिकंबूलमन्येन सहाया ल्लाभदायकं ॥ २९॥ अर्थ-१ लग्नेश आणि कार्यश यांचा इत्थशाल योग असावा. २ या दोनी ग्रहाशी इत्थशाल योग न करणारा चंद्र ३० व्या अंशी असून शून्यमार्गग असावा. ३ या चंद्रस्थित राशीच्या पुढच्या राशीस असलेला ग्रह स्वोर्चा किंवा स्वगृहीचा असावा. ४ या स्वोची किंवा स्वगृही असलेल्या ग्रहाशी चंद्राचा भविष्य इत्थशाल योग असावा ही चार लक्षणे असतां गैरिकंबूल योग होतो. चंद्राचा ज्या ग्रहाशी भविष्यइत्थशाल योग असेल त्या ग्रहाच्या अधिकार परत्वे या गैरिकंबूट योगाचे मेद ४ होतात. त्या भेदाचे लक्षणा. वरून त्याचे नांव व फळ याचे कोष्टक खाली दिले आहे. |चंद्राशी भविष्य इत्थशाल योगकारक ग्रहाचा अधिकार योगाचें नांव फळ. उत्तम अधिकार. उत्तम गैरिकंबल, मध्यम अधिकार. | मध्यम गैरिकंबूल. दुसऱ्याच्या साह्याने कार्य करणारे. | दुसऱ्याच्या साह्याने मध्यम कार्य करणारे. आनष्ट फल देणारे. | अतिशय अनिष्ट फल देणारे. सम अधिकार. सम गैरिकंबूल. अधम गैरिकंबूल. अधम अधिकार.