पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४९) उदाहरण. कंबूल योगाचे उदाहरण पृष्ठ ४६ यांत दिले आहे. त्यांत लग्नेश स्वगृहीचा; व कार्येश स्वगृहीचा ह्मणजे दोनीग्रह एकाच ( उत्तम) अधिकाराचे आहेत. आणि चंद्र ही उत्तम अधिकारी ( स्वउच्चीचा ) आहे ह्मणून हा कोष्टकांत दर्शविल्या प्रमाणे उत्तमोत्तम कंबल योग झाला. याचे फळ उत्तमोत्तम रीतीने कार्य सिद्ध करणार आहे असे जाणावें. या रीतीने या तिनी ग्रहांच्या अधिकार परत्वें कंबूल योगाचे भेद व त्यांची फळे कोष्टकावरून जाणावीत. प्रकार २ रा. ता, नी. लमकार्यपयोरित्थशाले चैकोऽस्ति नीचगः ॥ स्वादि पदहीनोऽन्योऽत्रैदुः कंबलयोगकृत ॥ २५॥ तत्रकार्याऽल्पताञया यथाजात्यर्थमर्थयन् ॥ अन्यजातिः पुमानर्थ तथैतत्कवयोविदुः ॥ २६॥ अर्थ-लग्नेश आणि कार्येश यांचा निरनिराळा अधिकार असला तरी कंबूल योग होतो. त्याचे लक्षण. १ लग्नेश आणि कार्येश यांचा इत्थशाल योग असावा. २ या दोघांतील एकग्रह स्वनीचगृहस्थ आणि दुसरा समाधिकारी असावा. ३ त्या दोघांशी चंद्राचा इत्थशाल योग असावा. या तीन लक्षणांनी कंबूल योग होतो, याचे फळ कार्याची अल्प सिद्धि करणारे आहे.