पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४४) उदाहरण. बध. गरु. मंगळ. रा. ५ ११ २ अं. १० १५ ११ या उदाहरणांत लग्नेश बुध; कार्येश गुरु यांची परस्परांवर दृष्टि आहे. या दोवांत बुध शीघ्रगतिग्रह आहे. या पासून मंगळ १० स्थानी आहे. शीघ्रगतिग्रह बुध याची दीप्तांशसंख्या ९ आहे. या वुधस्थित अंशाचे पुढचे ९ अंशाचे आंत सदर मंगळ आहे. ह्मणून हा बुध व गुरु यांचा मणऊ योग झाला. प्रकार २ रा. १ लग्नेश आणि कार्येश यांचा इत्थशाल योग असावा. २ या दोघांतील एका ग्रहास शनि आणि मंगळ; राशीने युक्त असावा. ३ लग्नेश आणि कार्येशस्थित अंशापेक्षा त्याच्या त्याच्या दीप्तांशाच्या संख्ये इतक्या अंशाने मागे-किंवा पुढे असलेले, वरील शनि आणि मंगळ असावे. ही तीन लक्षणे असतां मणऊ योग होतो. मणऊ व इत्थशाल हे दोनी योग आहेत तरी मणऊ योगाचेच फळ मिळतें.