पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यमया योगाचे तात्पर्य. दोन ग्रहाची एकमेकांवर दृष्टि नाही. परंतु या दोघापेक्षा मंदगति असून मध्ये असलेला ग्रह त्या दोघावरही पहात असल्याने, त्या दोघांतील जलदग्रहाचे तेज घेऊन मंदग्रहास देतो. ७ वा मणऊ योग. ता. नी. वक्रःशनिर्वा यदिशीघरखेटात्पश्चात्पुरस्तिष्ठति तुयदृष्ट्या ॥ एकर्भ सप्तर्षभुवा दृशावा पश्यन्नथां शैरधिकोनकैश्वेत् ॥ १० ॥ तेजोहरेत्कार्य पदेस्थशाली स्थितोऽपिवाऽसौ मणऊ शुभोन ॥ यदीत्थशालोस्त्युभयोः स्वदीप्तहीनाऽधिकांशैः शनिभूसुतौचेत् ॥ ११॥ एकदंगो लमपकार्यपौ स्तस्तेजोहरौ कार्यहरौ निरुक्तौ ॥ १२ ॥ अर्थ-मणऊ योगाचे दोन प्रकार आहेत. प्रकार १ला. लग्नेश आणि कार्येश यांची परस्परावर दृष्टि असावी. २ यांतील शीघ्रगति ग्रहापासून ४१ किंवा ७ यांतील स्थानी शनिः किंवा मंगळ असावा. ३ या लक्षणाने युक्त असलेला शनि किंवा मंगळ; लग्नेश व कार्यश यांतील शीघ्रगतिग्रहस्थित अंशापेक्षां या शीघ्रगति ग्रहाच्या दीप्तांशाच्या संख्ये इतक्या अंशापर्यंत जास्त-किंवा तितक्या अंशापर्यंत मार्ग असावा. ही तीन लक्षणे असतां मणऊ योग होतो. या योगाचे फळ कार्यनाश करणारे आहे. मणऊ व इत्थशाल या दोनी योगाची प्राप्ति असतां इत्थशालाचे फळ न मिळतां मणऊ योगाचेच फळ मिळतें असें जाणावें.