पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४०) इत्थशाल योगाचे तात्पर्य, 2. दोनग्रहांत जलदगतीचा ग्रह मागे असच्याने आपल्या दीप्तांशाच्या आत असलेल्या पुढच्या ग्रहास अंशादिकानी गांठू शकतो आणि एकमेकाची दृष्टि एकमेकावर असते ह्मणून जलदगतीचाग्रह आपलें तेज पुढील ग्रहास देतो. ४ ईसराफ किंवा मूसरीफ योग. ता. नी. शीघोयदा मंदगतेस्थैकमप्यंशमभ्येति तदे सराफः ॥ कार्यक्षयो मूसरिफे खलोत्थे सोम्येन हिल्लाजमतेन चिन्त्यं ॥७॥ अर्थ-१ लग्नेश माणि कार्येश यांतील मंदगतिग्रहा पेक्षांशीघ्रगतिग्रह एका अंशाने जरी पुढे असला तरी ईसराफ योग होतो. हे दोन्हीग्रह शुमसंज्ञक असतां या योगाचें फळ शुभदायक आहे. हे दोन्हीग्रह अशुभसंज्ञक असतां याचे फळ अशुभ दायक आहे. यांतील एक शुभ व एक अशुभ असतां याचें फळ मिश्र आहे असें जाणावें. उदाहरण. बुध. गुरु. यांतील शीघ्रगतिग्रह बुध, १ अंशाने दुसऱ्याग्रहारा. २७ पेक्षा पुढे आहे ह्मणून बुध व गुरु यांचा ईसराफ अं. १४ १३ योग आहे. गति २०१७ ईसराफ योगाचे तात्पर्य, दोन ग्रहांत जलदगतीचाग्रह अंशाने पुढे असल्याने दोघांची अंशाने गांठ पडण्याचा संभव नसतो.