पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८) प्रकार १ ला. लग्नेश आणि कार्येश यांचा इत्यशाल योग असून ते दोघे अंशादिकांनी मात्र तुल्य (सारखे) असावेत म पूर्ण इत्थशाल योग होतो. याचे फळ कार्याची संपूर्ण सिद्धि करणारे आहे. उदाहरण. रवि. मंगळ. अं.१६ १६ यांचा इत्थशाल योग असून ते अंशादिकांनी तुल्य २६ आहेत. करितां हा पूर्ण इत्थशाल योग झाला. वि.१०६० गति.१६४१२ प्रकार २ रा. लग्नेश आणि कार्येश यांचा इत्थशाल योग असून त्या दोघांचें अंतर मात्र ३० विकला पेक्षा कमी असतां पूर्ण इत्थशाल योग होतो. या पूर्ण इत्यशाल योगाचें फळ कार्याची संपूर्ण सिद्धि करणारे आहे असें जाणावें. उदाहरण रवि. मंगळ. १६ १६ यांचा इत्थशाल योग असून यांतील दोघांचे अंतर २९ २६ २६ विकला आहे. करितां हा पूर्ण इत्थशाल योग झाला. ५७४० ९४ १२ ३ च्या भेदाचें लक्षण. (भविष्य इत्थशाल योग-) भविष्य इत्यशाल योगाचे दोन प्रकार आहेत.