पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३७) अर्थ-१ ला वर्तमान इत्थशाल; २ रा पूर्ण इत्थशाल; याणि ३रा भविष्य इत्थशाल असे या इत्थशाल योगाचे मुख्य भेद ३ आहेत. १ ल्या भेदाचे लक्षण. ( वर्तमान इत्थशाल योग.) १ लग्नेश आणि कार्येश यांची परस्परांवर दृष्टि असावी. २ या दोघांतील शीघ्रगतिग्रह अंशाने मार्ग असावा. (आणि दुसरा म.. मंदगतिग्रह, त्या शीघ्रग्रहापेक्षां अंशाने पुढे असावा.) ३ वरील दानग्रहाचे अंशादि अंतर त्यांतील शीघ्रगतिग्रहाचे दप्तिांशाहन कमी असावे. ही तनि लक्षणे असतां इत्थशाल योग ( वर्तमान इत्थशालयोग) होतो. या योगाचें फळ हल्ली त्या कार्याचे सुख देणारे आहे असें जाणावें. उदाहरण. मंलग्न रवि. मंगळ. रा. ४ अं.१० १६ 120 या उदाहरणांत मंगळ लग्नेश आणि रवि कार्येश आहे. रवि व मंगळ यांची परस्परावर दृष्टि आहे. यांतील शीघ्रगतिग्रह रवि अंशाने मार्ग आहे. व दुसरा अंशाने पुढे आहे. या दोघांचे अंशादि अंतर असून ते शीघ्रगतिग्रह रवि याचा दीप्तांशाच्या आंत आहे. झणन हा इत्थशाल योग झाला. २ च्या भेदाचें लक्षण. ( पूर्ण इत्थशाल योग) पूर्ण इत्थशाल योगाचे दोन प्रकार आहेत.