पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उदाहरण १ लें. पृच्छकाचा प्रश्न मला द्रव्य मिळेल काय? असा असतां प्रश्नकालिक लग्न स्वामीस " लग्नेश " आणि द्रव्याचा विचार द्वितीयभावा वरून करावा लागतो ह्मणून लग्नापासून द्वितीय स्थानाच्या अधिपतीस " कार्यश" असें ह्मणावें. उदाहरण २ रें पृच्छकाचा प्रश्न माझ्या भावास ( बंधूस) द्रव्य मिळेल काय ? असा असतां बंधूचे स्थान तृतीयभाव आहे ह्मणून प्रश्नकालिक लग्ना पासून तृतीय स्थानास लग्न व त्याच्या स्वामीस लग्नेश; आणि द्रव्याचा विचार द्वितीय भावावरून करावा लागतो ह्मणून त्या (तृतीय स्थाना ) पासून द्वितीय स्थानास ह्मणजे चतुर्थ भावास कार्यस्थान व त्यांच्या स्वामीस कार्यश असें ह्मणावें. ताजिक शास्त्रोक्त षोडश योग दर्पणाचा २ रा उपकरणाध्याय समाप्त. ३ रा षोडश योगाध्याय. सोळा योगांची नांवें. ता० नी प्रागिक वालोऽपर इंदुवारस्तथेत्थशालोऽपर ईस. राफः ॥ नक्तंततः स्याद्यमया मणाऊ कंबूलतो गैरिकबलमुक्तं ॥१॥ खल्लासरं रद्दमथो दुफालिकुत्थं च दुत्थोत्यदिबीरनामा ॥ तंबीर कुत्थी दुरुफश्च योगाःस्युःषोडशेषां कथयामिलक्ष्म ॥२॥ अर्थ-१ ला इकवाल; २ रा इंदुवार; ३ रा इत्थशाल किंवा मुत्थील; ४ था इसराफ; ५ वा नक्त; ६ वा यमयाः ७ वा