पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८) उदय साधन करावेत. यांस स्वोदय असे ह्मणतात. इष्टकालिक स्पष्टग्रह व यांची गति. ज्या ग्रंथावरील ग्रहगणित दृक्प्रत्ययास येत असेल त्यावरून रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शान व राहू हे स्पष्टग्रह व त्यांची स्पष्ट गति साधन करून घ्यावी. गतिसहित स्पष्टग्रह मांडण्याचीरीति. प्रत्येक ग्रह व लग्न भुक्तराशि, अंश, कला व विकलात्मक आंकड्याने लिहून आडवी रेघ मारावी. व तिचे खाली कला, विकलात्मक त्या ग्रहाची स्पष्टगति लिहावी. याचे उदाहरण इष्ट कालिक ग्रह वर्णन कोष्टकांत दिले आहे. इष्टकालिक लग. इष्ट कालचा स्पष्टसूर्य व स्वोदय यांचे योगाने इष्टकालिक लग्न साधन करावे. इष्टकालिक लमकुंडलि मांडणेंची रीति. इष्टकाली जे लग्न असेल त्याचा वर्तमान राशीचा अंक मध्ये लिहून डाव्या बाजूचे क्रमाने त्याचे पुढच्याराशी लिहाव्या. व ज्या वर्तमान राशीस जो ग्रह असेल त्याचे आद्याक्षर लिहावें. याचे उदाहरण इष्टकालिक ग्रहवर्णन कोष्टकांत दिले आहे. ग्रहमैत्री कोष्टक मांडणेची रीति यांत संज्ञाध्याय श्लोक ५ पृ० ३ याचे आधारें रवि वगैरे सातग्रहाखाली त्या ग्रहाचे मित्र कोष्टकांत मित्र ग्रहाचें; सम कोष्टकांत सम ग्रहाचे व शत्रु कोष्टकांत शत्रु ग्रहाचे आद्याक्षर लिहावे याचे उदाहरण इष्टकालिक ग्रह वर्णन कोष्टकांत दिले आहे. ® टीप-बहतकरून स्पष्टग्रह ग्रहलाघव ग्रंथावरून करितात. यावरील ग्रहगणितांत काही अंतर येते. व या षोडशयोग प्रकरणी स्पष्टग्रहांत १ कलेची सुद्धा चक खपत नाहीं करितां वे० शा० रा. रा. केतकर कृत ज्योतिर्गणित किंवा ग्रहगणित ग्रंथावरून स्पष्टग्रह व लमसाधन करावे अशी सूचना आह.