पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९) इष्टकालिक ग्रहवर्णन कोष्टक मांडण्याची रीति. इष्टकालीन स्पष्टग्रहाचे गती खाली " वक्रादि कोष्टकांत " ज्या ग्रहाचें वक्र, अस्त, बाल, किंवा वृद्ध यांतील जे लक्षण असेल ते लिहावे. त्याचे खाली " स्थान कोष्टकांत " जो ग्रह स्वोची असेल तेथें “ उच्च;" व जो ग्रह स्वगृहींचा असेल तेथें "ख" ; जो मित्रगृहींचा असेल तेथें "मित्र" जो समगृहींचा असेल तेथें " सम"; जो शत्रुगृहींचा असेल तेथें "शत्र" आणि जो ग्रह स्वनीचीचा असेल तेथे " नीच" असे लिहावें. त्याचे खाली अंशवर्णनांत " जो ग्रह स्वद्रेष्काणी; स्वनवांशी; व स्वहद्दांशी असेल तर त्यांचे त्यांचे कोष्टकांत "स्व" असें अक्षर लिहावें. त्याचे खाली जो ग्रह आपल्या परमोच्चांशी असेल तेथे " प. उ. अं. | जो ग्रह परमनीचांशी असेल तेथें “ प. नी. अं." असे लिहावें. त्याचे खाली अधिकार वर्णनांत त्या ग्रहाचा जो अधिकार असेल तो लिहावा. उदाहरण. शके १८२२ ज्येष्ठ शुक्ल १५ बुधवारी सूर्योदयानंतर ० घटि, २ पढ़ें या इष्टकालाचे ग्रहवर्णन कोष्टक.