पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ता० नी० आये सर्वार्थधान्याऽर्घकन्यामित्रचतुष्पदाः ॥ राज्ञोवित्तं परीवारो लाभोपायाँश्च भूरिशः ॥ ४५ ॥ अर्थ-धनलाभ, दोनीपाय, डावाकान, थोरला भाऊ (बहिण) सर्व प्रकारची द्रव्ये, धान्याचे मोल, कन्या, मित्र, पशु हत्ती घोडे यांचे ऐश्वर्य, राजाचे द्रव्य, कुटुंब, विचार, लाभ, परिवार इत्यादि गोष्टींचा विचार लग्नापासून एकादशस्थानापासून करावा. द्वादश भावावरील विचार. स० चिं० व्ययभवनाद्ययमखिलं पतनं नरकेच कैवल्यं ॥ वामाऽक्षिचरण युगुलं शयनस्थानं विनिर्दिशेत्याज्ञः।४६। ता० नी० व्यये वैरि निरोधार्ति व्ययादि परिचिंतयेत् ॥४७॥ अर्थ-सर्व प्रकारचा व्यय, शत्रूनी केलेला प्रतिबंध, पीडा, नरकमाप्ति, डावा डोळा, दोन्हीपाय, शयनस्थान इत्यादि गोष्टींचा वि. चार लग्नापासून द्वादश स्थानावरून करावा. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पणाचा १ ला संज्ञाध्याय समाप्त